“हा फक्त ट्रेलर…” पिंपरीत फर्निचर दुकानावर गोळीबार; व्यावसायिकाला थेट जीवे मारण्याची धमकी

By: Editor_Manas

On: Saturday, May 16, 2026 5:08 PM

Google News
Follow Us

प्रतिनिधी – मानस, पिंपरी-चिंचवड : शहरातील ताथवडे चौक परिसरात शुक्रवारी रात्री फर्निचर दुकानावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करत परिसरात दहशत निर्माण केली. दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी दुकानाच्या फलकावर पाच ते सहा गोळ्या झाडून घटनास्थळावरून पलायन केले.

ही घटना शुक्रवारी (ता. १५) रात्री साडेनऊच्या सुमारास रावेत-औंध बीआरटी मार्गावरील ए.जे. फर्निचर दुकानाजवळ घडली. गोळीबारानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच रावेत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरात नाकाबंदी करत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. हल्लेखोर नेमके कोण होते, किती गोळ्या झाडण्यात आल्या आणि हल्ल्यामागील कारण काय, याचा तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन फटांगरे यांनी दिली.

दरम्यान, बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या शुभम लोणकर नावाच्या व्यक्तीने फेसबुक पोस्टद्वारे या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित पोस्टमध्ये फर्निचर दुकानाच्या मालकाला धमकी देण्यात आली असून, “हा फक्त ट्रेलर आहे, पुढची गोळी थेट डोक्यात असेल,” असा इशारा देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणामुळे पिंपरी-चिंचवड परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

May 16, 2026

May 16, 2026

May 16, 2026

May 16, 2026

May 15, 2026

किर्लोस्कर

May 15, 2026