डॉ. केतन देशपांडे यांना ‘डॉ. बी.एम.एल. मुंजाल सोशल इम्पॅक्ट पुरस्कार’ प्रदान

By: Editor_Manas

On: Saturday, May 16, 2026 2:08 PM

Google News
Follow Us

प्रतिनिधी – मानस, पुणे : शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनासाठी झटणाऱ्या ‘फ्रेंड्स युनियन फॉर एनर्जायझिंग लाइव्ह्ज’ (फ्युएल) या संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. केतन देशपांडे यांना मानाच्या ‘डॉ. बी.एम.एल. मुंजाल सोशल इम्पॅक्ट पुरस्कार २०२६’ ने नुकतेच सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथील ‘इंडिया हॅबिटॅट सेंटर’मध्ये आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात “शिक्षणाच्या प्रसारासाठी केलेले उत्कृष्ट प्रयत्न” या श्रेणीत त्यांना हा गौरव प्रदान करण्यात आला.

हिरो ग्रुपचे संस्थापक डॉ. ब्रिजमोहन लाल मुंजाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा हा पुरस्कार समुदाय विकास आणि तळागाळातील सामाजिक बदलांसाठी कार्यरत असलेल्या व्यक्तींना दिला जातो. रमण कांत मुंजाल फाउंडेशन आणि हिरो फ्युचर एनर्जीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या पुरस्कार सोहळ्याचे हे तिसरे वर्ष होते. या सोहळ्यात शिक्षणाच्या प्रसारासाठी केलेल्या उत्कृष्ट प्रयत्न या श्रेणीत डॉ. केतन देशपांडे यांना डॉ. बी.एम.एल. मुंजाल सोशल इम्पॅक्ट पुरस्कार २०२६’ ने सम्मानित करण्यात आले। स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र आणि 1 लाख रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरुप होते।

डॉ. केतन देशपांडे यांनी गेल्या १८ वर्षांपासून ‘फ्युएल’च्या माध्यमातून वंचित आणि कुटुंबातील पहिल्या पिढीतील शिकणाऱ्या तरुणांसाठी मोलाचे कार्य केले आहे. भारतभरातील विविध राज्यांमध्ये प्रशिक्षण, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शनाद्वारे १० लाखांहून अधिक तरुणांपर्यंत त्यांनी आपली सेवा पोहोचवली आहे. या कार्याला कॅपजेमिनी, एसबीआय फाउंडेशन, एचडीएफसी बँक, सिप्लाचे अध्यक्ष डॉ. युसूफ हमीद यांसारख्या नामांकित संस्था आणि व्यक्तींचे पाठबळ लाभले आहे. संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत २.९ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना भविष्यातील कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले असून, २,९०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला आहे. या कार्याची दखल घेत डॉ. देशपांडे यांना यापूर्वी ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज’ यासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ते अशोका फेलो देखील आहेत. 

महाराष्ट्रात कौशल्य विद्यापीठाची मुहूर्तमेढ

डॉ. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘फ्युएल’ने महाराष्ट्रात ‘फ्युएलस्किलटेक अँड आंत्रप्रेन्योरशिप युनिव्हर्सिटी’ची स्थापना केली आहे. राज्य शासनाने याला खाजगी कौशल्य विद्यापीठ म्हणून मान्यता दिली असून, येथे उद्योग अनुभवासोबत शैक्षणिक अभ्यासक्रम शिकवण्यावर भर दिला जातो.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News