पुणे, मार्च २०२४ : भारताचा क्रमांक एकचा ट्रॅक्टर निर्यात ब्रँड सोनालिका ट्रॅक्टर्स भारतातील कृषी व्यवस्थेला शेती यांत्रिकीकरणाकडे नेण्यात अग्रणीची भूमिका अभिमानाने पार पाडत आहे. आपल्या २०–१२० एचपी हेवी ड्यूूटी ट्रॅक्टर रेंजद्वारे ते शेतकऱ्यांचे जीवन आणखी सुखी करत आहेत. आर्थिक वर्ष २०२४ च्या शेवटच्या टप्प्यात येताना, १६.१ टक्के एवढा आजवरचा फेब्रुवारीतील उच्चांकी वाटा आणि उद्योगातील बाजारपेठेच्या वाट्यातील सर्वाधिक वाढ गाठताना सोनालिका ट्रॅक्टर्सला आनंद होत आहे. यात फेब्रुवारी २०२४ मधील एकंदर ९,७२२ ट्रॅक्टरच्या विक्रीच्या दमदार कामगिरीचा समावेश आहे. कंपनीच्या आर्थिक वर्ष २०२३ च्या एकंदर ९१५४ ट्रॅक्टरच्या विक्रीच्या कामगिरीपेक्षा हा आकडा ६.२ टक्क्यांनी जास्त आहे. एकंदर विक्रीच्या बाबतीत उद्योग अजूनही संघर्ष करत असताना, सोनालिका उद्योगाच्या कामगिरीपेक्षा पुढे राहिली आहे. ट्रॅक्टर उद्योगात वाढ नोंदविणारा हा एकमेव अग्रगण्य ब्रँड ठरला आहे.
ट्रॅक्टर क्षेत्रातील प्रत्येक वर्गात अग्रगण्य आणि सर्वाधिक विश्वासार्ह ट्रॅक्टर ब्रँड होण्याच्या ठाम विश्वासासह सोनालिकाने नुुकतेच ४०–७५ एचपी श्रेणीत १० नव्या मॉडेलसह आपल्या प्रसिद्ध आणि प्रीमियम ‘टायगर ट्रॅक्टर मालिके’चा विस्तार केला आहे. आपल्या सर्वात मोठ्या व सर्वात शक्तिशाली तरीही इंधन कार्यक्षम इंजिन, सीआरडीएस तंत्रज्ञान, मल्टी स्पीड ट्रान्समिशनसह काटेकोर हायड्रॉलिक्स यांच्याद्वारे कंपनी सर्व प्रदेशांतीलल शेतकऱ्यांची कृषी यशोगाथा लिहिण्यासाठी त्यांच्याशी भागीदारी करत आहे. भारतीय शेती व्यवस्थेची नाडी ओळखून सोनालिकाने १००० पेक्षा अधिक चॅनेल पार्टनरचे आणि १५००० पेक्षा अधिक रिटेल पॉईंट्सचे जाळे उभारले आहे. शेतकऱ्यांच्या शक्य तेवढे जवळ राहून त्यांना आधुनिक शेती यंत्रसामुग्री उपलब्ध करून देणे हा त्याचा हेतू आहे.
इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक श्री. रमण मित्तल म्हणाले आमच्या सर्वात विशाल हेवी ड्यूटी ट्रॅक्टर श्रेणीमध्ये नुकतीच १० नवीन टायगर ट्रॅक्टर मॉडेलची भर पडली आहे. शेतकऱ्यांकडून तिचे भरघोस कौतुक होत असून तिचा स्वीकार होत आहे कारण इंजिन, ट्रान्समिशन आणि हायड्रॉलिक्स यांबाबतीत त्यात अनेक नवीन श्रेष्ठ तंत्रज्ञान मिळतात. शेतकऱ्यांना अधिक शाश्वत भविष्याकडे जाण्यासाठी सहाय्य करणे, ही आम्हाला चालना देणारी गोष्ट आहे. भविष्यातही आम्ही अधिक तीव्रतेने ते करत राहू.