मोठी खळबळ : नीलम गोऱ्हेही अशोक खरातच्या भक्त, नाशिकच्या ५ स्टार हॉटेलमध्ये भेट, तृप्ती देसाईंच्या दाव्याने खळबळ

By: Editor_Pratik

On: Monday, March 30, 2026 5:30 AM

Google News
Follow Us

Ashok Kharat Case : नाशिकच्या स्वयंघोषित ‘कॅप्टन’ अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला असतानाच, आता या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नीलम गोऱ्हे या गेल्या 5 ते 6 वर्षांपासून अशोक खरातच्या संपर्कात होत्या आणि राजकीय फायद्यासाठी त्याला भेटत होत्या, असा खळबळजनक दावा देसाई यांनी केला आहे.

तृप्ती देसाई म्हणाल्या की, नीलम गोऱ्हे गेली पाच ते सहा वर्ष या भोंदूबाबा अशोक खरातकडे जात होत्या. त्यांना विधान परिषदेवर आमदारकी हवी होती. इतर वेळेस नीलम गोऱ्हे अनेक गोष्टींवर बोलतात. आता अशोक खरातवर का बोलत नाहीत? कारण त्यांचे खरातशी संबंध आहेत. त्या खरातकडे जात होत्या. नाशिकच्या कॉलेज रोड येथील अशोक खरातच्या ऑफिसमध्ये नीलम गोऱ्हे जात होत्या, असा आरोप त्यांनी केलाय.

तृप्ती देसाई पुढे म्हणाल्या की, तो पाथर्डी येथील हॉटेलमध्ये देखील भेटायला आला होता. तो तिथं तुम्हाला भेटण्यास का आला होता? तुमच्यात आणि त्याच्यात काही आर्थिक व्यवहार आहेत का? की आणखीन काही आहे? या सगळ्या गोष्टी समोर यायला हव्या. 39 आमदारांमध्ये नीलम गोऱ्हे या अशोक खरातला भेटायला जात होत्या. नाशिकमधील एक्स्प्रेस इन हॉटेलमध्ये ते भेटले. आमदारकी आणि मंत्रीपदासाठी अनेक वेळा त्या अशोक खरातला भेटल्या होत्या. नीलम गोऱ्हे या भविष्य पाहण्यासाठी जात होत्या, असा धक्कादायक दावा देखील त्यांनी केलाय.

विधान परिषद किंवा मंत्रीपदासाठी नीलम गोऱ्हे या नाशिकच्या कॉलेज रोडवरील अशोक खरातच्या ऑफिसला भेटायला जात होत्या. ज्या ऑफिसमध्ये अनेक महिलांवर अत्याचार झाला, त्याच ऑफिसला नीलम गोऱ्हे अशोक खरातला भेटल्या होत्या. नीलम गोऱ्हे यांची देखील चौकशी व्हायला हवी. नीलम गोऱ्हे या गेल्या सात ते आठ वर्षांपासून अशोक खरातला ओळखत होत्या. कोरोना काळाच्या आधी एका हॉटेलमध्ये नीलम गोऱ्हे यांना भेटण्यासाठी अशोक खरात आला होता, असे देखील तृप्ती देसाई म्हणाल्या.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now