तू एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील…डॉ. स्तुती सोनवणेंनी लिहलेल्या शेवटच्या नोटमध्ये मन केलं मोकळं

By: Editor_Pratik

On: Thursday, March 12, 2026 6:42 AM

Google News
Follow Us

मुंबई : मुंबईत एका डॉक्टर तरुणीने प्रियकराच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ८ मार्च रोजी या तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवलं. मृत तरुणीचं नाव डॉ. स्तुती बजरंग सोनावणे असं असून या प्रकरणी अँटॉप हिल पोलिसांनी तिचा प्रियकर फजल मोहम्मद खान (३१) याला लोअर परळ परिसरातून अटक केली आहे.

स्तुतीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तपासादरम्यान स्तुतीने लिहिलेली सुसाईड नोट समोर आली असून त्यामध्ये तिने आपल्या नात्यातील अनेक गोष्टी आणि प्रियकराकडून झालेल्या अपमानाचा उल्लेख केला आहे. या नोटमधील मजकूर अतिशय भावनिक आणि धक्कादायक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं होतं?

स्तुतीने पत्राची सुरुवात प्रियकराला उद्देशून केली आहे. दादरमध्ये झालेली पहिली भेट, दोघांनी एकत्र घालवलेले क्षण, वाढदिवसानिमित्त केलेला ताज हॉटेलमधील सेलिब्रेशन, अलीबाग ट्रिप, बाइक राईड्स आणि एकत्र घालवलेले रविवारचे दिवस अशा अनेक आठवणी तिने पत्रात लिहिल्या आहेत.

मात्र नात्यात पुढे जात असताना प्रियकराकडून तिला अपमानास्पद बोलणं आणि मानसिक त्रास सहन करावा लागल्याचा आरोपही तिने पत्रात केला आहे. “तुझे शब्द इतके कठोर होते की त्यांनी मला पूर्णपणे तुटवून टाकलं,” असे ती म्हणते. तसेच त्याच्याकडून वारंवार अपमान झाल्याने स्वतःचा स्वाभिमान हरवल्यासारखं वाटल्याचंही तिने नमूद केलं आहे.

पत्रात तिने असेही म्हटले आहे की, नात्यात असतानाही प्रियकराने डेटिंग अॅप वापरले होते, तरीही तिने त्याला अनेकदा माफ केले. पण सततचा अपमान आणि भीतीमुळे ती मानसिकदृष्ट्या खचल्याचं तिने लिहिलं आहे.

कुटुंबीयांची माफी मागत घेतला टोकाचा निर्णय

सुसाईड नोटच्या शेवटी स्तुतीने आई-वडील, बहीण आणि जवळच्या व्यक्तींची माफी मागितली आहे. “मी खूप थकले आहे… मला हे आयुष्य जगता येत नाही,” असे लिहित तिने आपल्या कुटुंबीयांबद्दल प्रेम व्यक्त केले.

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास अँटॉप हिल पोलीस करत आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक करून चौकशी सुरू केली असून या नात्यात नेमकं काय घडलं याचा सखोल तपास सुरू आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now