iQOO Z11x १२ मार्चला लॉन्च; विद्यार्थ्यांसाठी दमदार बॅटरी आणि उच्च कार्यक्षमता
नवी दिल्ली : हाय-परफॉर्मन्स स्मार्टफोन ब्रँड iQOO १२ मार्च रोजी आपला नवीन स्मार्टफोन iQOO Z11x लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. विद्यार्थ्यांच्या वेगवान आणि बहुपयोगी जीवनशैलीचा विचार करून हा स्मार्टफोन विशेषतः डिझाइन करण्यात आला आहे.
कॉलेजमधील लेक्चर्स, ग्रुप प्रोजेक्ट्स, कोडिंग असाइनमेंट्स, ऑनलाइन क्लासेस आणि संशोधन यांसोबतच गेमिंग, स्ट्रीमिंग आणि सोशल मीडियासाठी दीर्घकाळ टिकणारा फोन विद्यार्थ्यांना आवश्यक असतो. या गरजांना लक्षात घेऊन iQOO Z11x मध्ये दमदार परफॉर्मन्स आणि दीर्घकाळ टिकणारी बॅटरी देण्यात आली आहे.
या स्मार्टफोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे सेगमेंटमधील सर्वात मोठी 7200 mAh बॅटरी. कंपनीच्या माहितीनुसार, एका चार्जवर सुमारे ४० तास व्हिडिओ प्लेबॅक, ९३ तास म्युझिक प्लेबॅक, १५.४ तास गेमिंग आणि १८.७ तास सोशल मीडिया वापर शक्य होतो. यासोबत 44W फ्लॅशचार्ज, रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट आणि ६ वर्षांपर्यंत बॅटरी हेल्थ यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
परफॉर्मन्ससाठी या फोनमध्ये MediaTek Dimensity 7400 Turbo प्रोसेसर देण्यात आला असून तो १० लाखांहून अधिक AnTuTu बेंचमार्क स्कोअर देतो. तसेच डिव्हाइसला २ वर्षांचे OS अपडेट्स आणि ४ वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स मिळणार आहेत.
स्मार्टफोनमध्ये मिलिटरी-ग्रेड प्रोटेक्शनसह IP68 आणि IP69+ डस्ट व वॉटर रेसिस्टन्स देण्यात आले आहे. त्यामुळे पडणे, पाणी सांडणे किंवा पावसात फोन वापरणे अशा परिस्थितीतही फोन सुरक्षित राहतो.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ५० मेगापिक्सेल Sony AI कॅमेरा देण्यात आला असून फ्रंट आणि रियर दोन्ही कॅमेऱ्यावर 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगचा सपोर्ट आहे. त्यामुळे कॅम्पसवरील क्षण टिपणे, प्रेझेंटेशन रेकॉर्ड करणे किंवा सोशल मीडियासाठी कंटेंट तयार करणे सोपे होते.
‘Make in India’ उपक्रमाअंतर्गत iQOO Z11x चे उत्पादन vivo च्या ग्रेटर नोएडा येथील उत्पादन केंद्रात केले जाणार आहे. तसेच ग्राहकांना देशभरातील ६७० हून अधिक सर्व्हिस सेंटर्सचे नेटवर्क उपलब्ध असणार आहे.









