Solapur Pandharpur Crime News : सासूला मारण्यासाठी विषप्रयोग; पतीच ठरला बळी – पंढरपूर हादरले

By: Editor_Pratik

On: Saturday, February 21, 2026 1:56 PM

Google News
Follow Us

Solapur Pandharpur Crime News : सासूला मारण्यासाठी विषप्रयोग; पतीच ठरला बळी – पंढरपूर हादरले

सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव येथे सासूला मारण्याच्या उद्देशाने सुनेने पाण्यात विष मिसळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र हे पाणी चुकून पिल्याने पतीचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सारिका लोहार हिचे गावातीलच शेखर चंदनशिवे याच्याशी अनैतिक संबंध होते. या प्रकरणाची माहिती सासूला मिळाल्याने घरात वारंवार वाद होत होते. सासू अडथळा ठरत असल्याने तिला मारण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप आहे. शेखरने विषारी औषधाची बाटली सारिकाला दिली आणि तिने ते पाणी भरलेल्या कळशीत मिसळले.

रात्री सासूने त्या कळशीतील पाणी प्यायले; मात्र चव कडू लागल्याने तिने ते पाणी मुलगा समाधानजवळ ठेवले. त्याने ते पाणी पिल्यानंतर त्याला उलट्या सुरू झाल्या. तातडीने रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी व लोहार समाजाने आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत पंढरपूर उपविभागीय पोलीस कार्यालयावर मोर्चा काढला. दरम्यान, पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी सारिका लोहार व तिचा प्रियकर शेखर चंदनशिवे यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सुरू आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

April 21, 2026

Malabar मलबार

April 20, 2026

April 18, 2026

April 17, 2026

April 16, 2026

April 16, 2026