जागतिक स्तरावर ऐतिहासिक उपक्रम : Bharti Airtel कडून ३६ कोटी भारतीय ग्राहकांना Adobe Express Premium मोफत

जागतिक स्तरावर ऐतिहासिक उपक्रम : Bharti Airtel कडून ३६ कोटी भारतीय ग्राहकांना Adobe Express Premium मोफत

नवी दिल्ली, जानेवारी २०२६ : भारताची आघाडीची दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनी भारती एअरटेलने आपल्या ३६ कोटी ग्राहकांसाठी एक ऐतिहासिक आणि जागतिक स्तरावर पहिल्यांदाच राबवला जाणारा उपक्रम जाहीर केला आहे. एअरटेलने Adobe सोबत भागीदारी करत Adobe Express Premium हे एआय-आधारित, वापरण्यास सोपे आणि अत्याधुनिक डिझाइन अ‍ॅप वर्षभरासाठी मोफत उपलब्ध करून दिले आहे. या सबस्क्रिप्शनची मूळ किंमत सुमारे ₹४,०००* आहे.

या उपक्रमामुळे एअरटेलचे ग्राहक सोशल मीडिया पोस्ट्स, मार्केटिंग मटेरियल, छोटे व्हिडिओ, प्रेझेंटेशन्स आणि इतर कोणतेही डिझाइन्स कमी वेळात आणि कमी श्रमात तयार करू शकतील. विशेष म्हणजे, डिझाइनिंगचा पूर्वानुभव नसलेल्या ग्राहकांनाही त्यांच्या कल्पकतेच्या बळावर व्यावसायिक दर्जाचे कंटेंट तयार करणे शक्य होणार आहे.

ही सुविधा मोबाईल, वाय-फाय आणि डीटीएच सेवा वापरणाऱ्या एअरटेलच्या सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. ग्राहक Airtel Thanks App वर लॉग-इन करून, क्रेडिट कार्डची कोणतीही आवश्यकता नसताना, हे प्रीमियम सबस्क्रिप्शन सहज सक्रिय करू शकतात.

या भागीदारीविषयी बोलताना Siddharth Sharma, सीईओ – कनेक्टेड होम्स आणि संचालक – मार्केटिंग, भारती एअरटेल, म्हणाले,

“अत्याधुनिक एआय साधनांच्या माध्यमातून कोट्यवधी भारतीयांना सर्जनशीलता आणि नवकल्पनांसाठी सक्षम करणे, हा या भागीदारीमागचा मुख्य उद्देश आहे. पहिला रिझ्युम तयार करणारा विद्यार्थी असो, व्यवसायासाठी पोस्टर डिझाइन करणारा छोटा उद्योजक असो किंवा फॉलोअर्ससाठी व्हिडिओ एडिट करणारा कंटेंट क्रिएटर असो—प्रत्येक एअरटेल ग्राहकाला स्वतःची अभिव्यक्ती मांडण्यासाठी आवश्यक साधने देणे आम्हाला महत्त्वाचे वाटते. Adobe Express मुळे जागतिक दर्जाची सर्जनशील साधने आता प्रत्येक भारतीयासाठी सहज उपलब्ध होत आहेत.”

यावर प्रतिक्रिया देताना David Wadhwani, अध्यक्ष – डिजिटल मीडिया, Adobe, म्हणाले,

“Adobe Express हे जलद आणि सोप्या पद्धतीने काहीही तयार करता येणारे अ‍ॅप असून, प्रत्येकाला स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. एअरटेलसोबतच्या या भागीदारीमुळे भारतातील कोट्यवधी लोकांना Adobe Express Premium मोफत उपलब्ध होणार आहे. यामुळे भारतातील क्रिएटर इकॉनॉमीला मोठी चालना मिळेल आणि करिअर, व्यवसाय किंवा वैयक्तिक आवडींसाठी दर्जेदार कंटेंट तयार करणे अधिक सोपे होईल.”

Adobe Express Premium मध्ये हजारो प्रोफेशनल डिझाइन टेम्पलेट्स उपलब्ध असून, ती भारतीय सण-उत्सव, लग्नसमारंभ आणि स्थानिक व्यवसायांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहेत. यामध्ये बॅकग्राउंड रिमूव्हल, कस्टम इमेज जनरेशन, वन-टॅप व्हिडिओ एडिटिंगसारखी एआय वैशिष्ट्ये, ३०,००० हून अधिक प्रोफेशनल फॉन्ट्स, १०० जीबी क्लाउड स्टोरेज, प्रीमियम स्टॉक अ‍ॅसेट्स, ऑटो-कॅप्शन्स आणि इन्स्टंट रीसाइज यांचा समावेश आहे. तयार केलेल्या कंटेंटवर कोणताही वॉटरमार्क नसतो आणि विविध डिव्हाइसेसवर सहज सिंक करता येते.

हे अ‍ॅप इंग्रजी, हिंदी, तामिळ आणि बंगाली भाषांमध्ये उपलब्ध असल्याने, वापरकर्ते आपल्या मातृभाषेतच सर्जनशील काम करू शकतात. सणासुदीच्या शुभेच्छा, लग्नाची निमंत्रणे, स्थानिक व्यवसायांसाठी जाहिराती किंवा व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस—हे सर्व आता सामान्य ग्राहकांनाही सहज तयार करता येणार आहे.

Airtel + Adobe Express Premium: कोणाला कसा फायदा?

  • क्रिएटर्स व इन्फ्लुएन्सर्स: रिल्स, यूट्यूब थंबनेल्स आणि व्हायरल कंटेंट झटपट तयार करता येईल.

  • सामान्य ग्राहक: वैयक्तिक शुभेच्छा, निमंत्रणे आणि दैनंदिन संवाद अधिक आकर्षक होतील.

  • विद्यार्थी: प्रोजेक्ट्स, प्रेझेंटेशन्स आणि पोर्टफोलिओद्वारे डिजिटल कौशल्ये विकसित होतील.

  • लघुउद्योजक व स्टार्टअप्स: सोशल मीडिया जाहिराती, पोस्टर्स, लोगो आणि क्यूआर कोड काही मिनिटांत तयार करता येतील.

  • मार्केटर्स: स्थानिक संस्कृती व ब्रँड ओळखीशी सुसंगत, प्रभावी आणि वेगळेपण जपणाऱ्या मोहिमा राबवता येतील.

*ग्राहक लाभ सध्याच्या सबस्क्रिप्शन मूल्यावर आधारित असून, १ वर्षासाठी वैध आहे. नियम व अटी लागू.