अझीम प्रेमजी विद्यापीठाने शिक्षक आणि शिक्षणतज्ञांसाठी पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया केली सुरू

पुणे२२ जानेवारी २०२६: अझीम प्रेमजी विद्यापीठाने त्यांच्या बंगळूरु विद्यापीठ प्रांगणात (कॅम्पस) शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञांसाठी पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू केल्याची घोषणा केली आहे. पूर्व प्राथमिक शिक्षण (अर्ली चाइल्डहूड एज्युकेशन) अभ्यासक्रमातील पदव्युत्तर पदविका, शैक्षणिक मूल्यमापनामध्ये पदव्युत्तर पदविका, अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांना शिकवण्यासाठी पदव्युत्तर पदविका आदी अभ्यासक्रमांचा यात समावेश आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ फेब्रुवारी २०२६ आहे

हा एक वर्षाचा अर्धवेळ पदविका अभ्यासक्रम असून, यामध्ये सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक शिक्षणाचा समावेश आहे. हा अभ्यासक्रम मिश्र स्वरुपात (ऑनलाइन आणि कॅम्पसमध्ये प्रत्यक्ष सत्रे) राबवला जाईल. नियमित शालेय क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञांच्या उच्च-गुणवत्तेच्या व्यावसायिक विकासासाठी हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाच्या लवचिक रचनेमुळे कार्यरत शिक्षकांना आपले काम सांभाळून शिक्षण घेणे शक्य होणार आहे.

हा पदविका अभ्यासक्रम शिक्षण क्षेत्रातील कार्यरत शिक्षकांसाठी तयार करण्यात आला आहे. त्यासाठी  शालेय शिक्षक आणि शिक्षक-प्रशिक्षक, विशेष शिक्षक, शालेय पदाधिकारी, सरकारी संस्था, खासगी संस्था किंवा शालेय प्रणालीशी संबंधित स्वयंसेवी संस्थांमध्ये काम करणारे शिक्षक अर्ज करू शकतात. अर्जदारांकडे किमान दोन वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

अझीम प्रेमजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ एज्युकेशनचे संचालक अंकुर मदन म्हणाले, “हे पदव्युत्तर अभ्यासक्रम शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पूर्व प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम, अध्ययन अक्षमता आणि मूल्यमापन यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रातील ज्ञान, कौशल्ये आणि दृष्टीकोन प्रदान करतात. हे अभ्यासक्रम अशा प्रकारे डिझाईन करण्यात आले आहेत की, ज्यामुळे कार्यरत शिक्षक/शिक्षणतज्ज्ञांना त्यांचे शिक्षण मुले आणि सहकाऱ्यांबरोबरच्या दैनंदिन व्यवहारात वापरता येईल. तसेच, स्वतःच्या कामातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांचा चिकित्सकपणे विचार करण्यास आणि त्यांची उत्तरे शोधण्यासही हे अभ्यासक्रम त्यांना प्रोत्साहित करतात.”

अभ्यासक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये

  • एक वर्षाचा, अर्धवेळ मिश्र स्वरुपाचा पदविका अभ्यासक्रम (हायब्रीड फॉरमॅट).
  • ऑनलाइन वर्ग आणि बंगळूरु विद्यापीठ प्रांगणात प्रत्यक्ष सत्रांचा समावेश.
  • प्रत्येक पदविका अभ्यासक्रमात प्रत्येकी १२ आठवड्यांच्या चार प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा समावेश.
  • पूर्ण पदविका अभ्यासक्रम किंवा वैयक्तिक प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी नोंदणी करण्याची लवचिक सुविधा.

अधिक माहितीसाठी: अर्ज करण्यासाठी आणि अभ्यासक्रम, पात्रता व शुल्काच्या अधिक तपशीलांसाठी https://azimpremjiuniversity.edu.in/pg-diplomas-and-certificates/education येथे क्लिक करा.