Aadhaar LPG Link : आधार–LPG गॅस कनेक्शन लिंक नसेल तर होऊ शकतं मोठं नुकसान; आजच पूर्ण करा हे महत्त्वाचं काम, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Aadhaar LPG Link : गॅस सबसिडी आणि इतर सरकारी लाभ थेट खात्यात मिळण्यासाठी सरकारने एलपीजी गॅस कनेक्शन आधारशी लिंक करणं अनिवार्य केलं आहे. या प्रक्रियेमुळे लाभार्थ्यांची ओळख निश्चित होते आणि बनावट किंवा डुप्लिकेट क्लेमवर आळा बसतो.

जर तुमचं एलपीजी कनेक्शन अद्याप आधारशी लिंक नसेल, तर तुम्हाला गॅस सबसिडी मिळण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे कोणताही आर्थिक तोटा टाळण्यासाठी हे काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करणं आवश्यक आहे. ही प्रक्रिया अतिशय सोपी असून ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धती उपलब्ध आहेत.

लिंकिंगसाठी आवश्यक दोन फॉर्म

आधार–LPG लिंक करण्यासाठी फॉर्म १ आणि फॉर्म २ भरावे लागतात.

  • फॉर्म १: एलपीजीसाठी बँक खातं आणि आधार लिंक करण्याचा अर्ज

  • फॉर्म २: एलपीजी ग्राहक क्रमांक/आयडी आधारशी लिंक करण्याचा अर्ज

हे फॉर्म एलपीजी वितरकाच्या कार्यालयात किंवा अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असतात.

आधार–LPG लिंक करण्याची ऑनलाइन पद्धत

महत्त्वाचं लक्षात ठेवा की संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन होत नाही. ऑनलाइन फक्त फॉर्म डाउनलोड करता येतात, प्रत्यक्ष जमा करणे आवश्यक आहे.

स्टेप १: तुमच्या एलपीजी गॅस कनेक्शन प्रोव्हायडरच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
(उदा. Indane, Bharat Gas, HP Gas)

स्टेप २: ‘LPG Services’ किंवा ‘Join DBTL using Aadhaar / Download Forms’ या पर्यायावर क्लिक करा.

स्टेप ३: फॉर्म १ आणि फॉर्म २ डाउनलोड करून त्यांची प्रिंट काढा.

स्टेप ४:

  • फॉर्म १ भरा

  • आधार कार्डची प्रत जोडा

  • हा फॉर्म तुमच्या बँकेत किंवा एलपीजी वितरक कार्यालयात जमा करा
    यामुळे तुमचं बँक खातं आधारशी आणि एलपीजी सबसिडीसाठी लिंक होईल.

स्टेप ५:

  • फॉर्म २ भरा

  • आवश्यक कागदपत्रांसह एलपीजी वितरक कार्यालयात जमा करा
    तपासणीनंतर तुमचा आधार क्रमांक एलपीजी ग्राहक आयडीशी लिंक केला जाईल.

आधार–LPG लिंक करण्याची ऑफलाइन पद्धत

स्टेप १: जवळच्या एलपीजी वितरक कार्यालयात भेट द्या.

स्टेप २: तिथून फॉर्म १ आणि फॉर्म २ घ्या.

स्टेप ३:

  • फॉर्म १ आधार कार्डच्या प्रतीसह बँकेत किंवा वितरक कार्यालयात जमा करा.

  • फॉर्म २ आवश्यक कागदपत्रांसह वितरक कार्यालयात जमा करा.

पोस्टाद्वारेही करू शकता लिंक

स्टेप १: अधिकृत वेबसाइटवरून फॉर्म १ आणि फॉर्म २ डाउनलोड करा.

स्टेप २: फॉर्म १ आधार कार्डच्या प्रतीसह बँकेत जमा करा.

स्टेप ३: बँक–आधार लिंक झाल्यानंतर फॉर्म २ भरून आवश्यक कागदपत्रांसह एलपीजी वितरकाच्या पत्त्यावर पोस्टाने पाठवा.

👉 टीप: आधार–LPG लिंकिंग वेळेत न केल्यास गॅस सबसिडी थांबू शकते. त्यामुळे विलंब न करता ही प्रक्रिया पूर्ण करा आणि सरकारी लाभांचा फायदा घ्या.