BMC Election Results 2026 : मुंबईच्या मतमोजणीत अनपेक्षित वळण; ठाकरे गटाची भरारी, राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

BMC Election Results 2026: मुंबईच्या मतमोजणीत अनपेक्षित वळण; ठाकरे गटाची भरारी, राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत शुक्रवारी संध्याकाळी मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू होताच भाजप आणि एकनाथ शिंदे गटाने भक्कम आघाडी घेतल्याचे चित्र होते. त्यामुळे ठाकरे गट ७० जागांच्या आतच अडकणार, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, मतमोजणीच्या पॅटर्नमध्ये झालेल्या बदलामुळे संध्याकाळपर्यंत चित्र पालटले.

दुपारपर्यंत भाजप एकहाती १०० जागांच्या पुढे जाईल, असे वाटत असताना प्रत्यक्षात भाजपची आघाडी कमी होत ८२ जागांवर आली. दुसरीकडे ठाकरे गटाने जोरदार मुसंडी मारत ५७ वरून थेट ६३ जागांपर्यंत मजल मारली आहे. अजूनही अनेक वॉर्डांमधील मतमोजणी प्रलंबित असल्याने निकालांमध्ये पुढील काही तासांत बदल होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंनी आशा कायम ठेवली आहे.

भाजप नेत्यांकडून मुंबई जिंकल्याचा जल्लोष सुरू असताना, राज आणि उद्धव ठाकरे अद्याप मौन बाळगून आहेत. पुढील काही तासांत मतमोजणीत आणखी उलटफेर होतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आतापर्यंतची आघाडी (मतमोजणी सुरू असताना):

  • भाजप: 82

  • शिंदे गट (शिवसेना): 26

  • ठाकरे गट: 63

  • मनसे: 7

  • शरद पवार गट: 1

  • काँग्रेस: 22

  • अजित पवार गट: 2

  • अपक्ष: 10

मुंबई महानगरपालिकेत बहुमताचा आकडा 114 आहे. आगामी तासांत भाजप व शिंदे गटाच्या जागांमध्ये घट आणि ठाकरे गटाच्या जागांमध्ये वाढ झाल्यास मुंबईत अत्यंत रंजक राजकीय परिस्थिती निर्माण होऊ शकते. काँग्रेस व अन्य घटकांसोबत युतीचे गणित जुळल्यास नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.