पुणे, ९ डिसेंबर २०२५ : अनंत नॅशनल युनिव्हर्सिटीने अलीकडेच ७ वा पदवीदान समारंभ आयोजित केला, ज्यामध्ये बॅचलर ऑफ डिझाइन, बॅचलर ऑफ आर्किटेक्चर, मास्टर ऑफ डिझाइन, अनंत फेलोशिप इन सस्टेनेबिलिटी अँड बिल्ट एन्व्हायर्नमेंट, एमएससी इन सस्टेनेबिलिटी अँड बिल्ट एन्व्हायर्नमेंट आणि अनंत फेलोशिप इन क्लायमेट अॅक्शन या अभ्यासक्रमांतील एकूण २९९ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. या समारंभाचे मुख्य अतिथी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आणि झोहो कॉर्पोरेशनचे चीफ सायंटिस्ट व सह-संस्थापक डॉ. श्रीधर वेम्बू होते. अनंत नॅशनल युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष श्री अजय पीरामल, प्रॉवोस्ट डॉ. संजीव विद्याथी तसेच बोर्डाचे सदस्य समारंभात उपस्थित होते.
पदवीधर विद्यार्थ्यांना संबोधित करताना डॉ. श्रीधर वेम्बू म्हणाले, “अनंत नॅशनल युनिव्हर्सिटीत येणे माझ्यासाठी अत्यंत आनंददायी ठरले. अनंतच्या विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि उद्देशपूर्ण डिझाइन्स पाहून मी प्रभावित झालो. मी येथे असे उल्लेखनीय कार्य पाहिले, जे आपल्या देशाला आज अत्यंत आवश्यक आहे. आपण अनेकदा भूतकाळातील उपलब्धींचा गौरव करतो, पण वर्तमानात आपण काय निर्माण करतोय याकडे कमी लक्ष देतो. आपण आपल्या आयुष्याच्या मर्यादेपलीकडे विचार करून भविष्यासाठी निर्माण करायला हवे—आणि अनंत आपल्या विद्यार्थ्यांना नेमके हेच शिकवत आहे. चांगला डिझाइन मन आणि आत्मा दोन्ही उन्नत करतो, आणि ही भावना मी या कॅम्पसमध्ये सर्वत्र अनुभवली. स्वप्ने पाहत रहा, तरुण राहा, प्रासंगिक राहा. जेव्हा आपण अहं विसरून ‘छाप पाडण्याचा’ प्रयत्न करत नाही, तेव्हा आपणच सर्वाधिक प्रभाव पाडतो. समस्येवर लक्ष केंद्रित करा—असाधारण काम आपोआप घडते.”
कार्यक्रमादरम्यान अनंत नॅशनल युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष श्री अजय पीरामल म्हणाले, “डिझाइन आपल्याला उद्योगांचे पुनर्कल्पन, समुदायांचे पुनर्निर्माण आणि पर्यावरणाचे पुनरुज्जीवन करण्याची साधने देते. हे ‘मेक इन इंडिया’ या आकांक्षेतून ‘डिझाइन फॉर इंडिया’ या तत्त्वज्ञानाकडे जाण्याचा प्रवास आहे जो सर्जनशीलता, शिल्पकला आणि संवेदनशीलतेवर आधारित आहे.
समारंभात विविध अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक उत्कृष्टता, उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी, सर्वोत्तम नवप्रवर्तन, सर्वोत्तम ग्रॅज्युएशन प्रोजेक्ट, सर्वोत्तम थीसिस, सर्वोत्तम लाइव्ह-एक्शन प्रोजेक्ट आणि सर्वोत्कृष्ट विद्यार्थी या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. पदवीदान समारंभासाठी विद्यापीठ कॅम्पसला एका सजीव प्रदर्शनीत रुपांतरित करण्यात आले होते, जिथे गॅलरी, ऑडिटोरियम आणि स्टुडिओंमध्ये विद्यार्थी प्रकल्प प्रदर्शित करण्यात आले—त्यांच्या नवप्रवर्तन आणि समर्पणाच्या प्रवासाचा उत्सव म्हणून.









