केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग लागू करण्याच्या दृष्टीने काम सुरु केले आहे. सरकारने आठव्या वेतन आयोगासाठी समिती स्थापन केली आहे. या समितीला पुढच्या १८ महिन्यात शिफारसी सादर करण्यास सांगितले आहे. शिफारसी सादर केल्यानंतर सरकार मंजुरी देणार आहे. त्यानंतर आठवा वेतन आयोग लागू केला जाईल.
सरकारने वेतन आयोगाच्या शिफारशींना मंजुरी दिली की त्यानंतर फिटमेंट फॅक्टरलादेखील मंजुरी दिली जाईल. आठव्या वेतन आयोगातील पगारवाढ ही फिटमेंट फॅक्टवर आधारित असते. दरम्यान, आता लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल. याचा फायदा कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होणार आहे.
सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २.५८ आहे. ८व्या वेतन आयोगात हा फिटमेंट फॅक्टर काय असणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
ऑल इंडिया एनपीएस एम्प्लॉइज फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मनजीत सिंह यांनी सांगितले की, नवीन वेतन आयोगाअंतर्गत कर्मचाऱ्याच्या मागील वेतन आयोगातील मूळ वेतनाचा नवीन फिटमेंट फॅक्टरनुसार गुणाकार होईल.
फिटमेंट फॅक्टर हा नवीन वेतन आयोगात शून्य होणार आहे. त्यानंतर तो पुन्हा वाढवला जातो. फिटमेंट फॅक्टर हा मूळ पगारावर मोजला जातो. सध्याचा डीए ५८ टक्के आहे. आठव्या वेतन आयोगाच्या शिफरसी लागू होईपर्यंत तो ७० टक्क्यांवर पोहचण्याची शक्यता आहे.
फिटमेंट फॅक्टरचा मूळ वेतन आणि एचआरएवर परिणाम होतो. त्यामुळे एकूण पगार २० ते २५ टक्के वाढू शकतो. उच्च पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पदोनत्तीची अधिक संधी आहे.
दरम्यान, नेक्सडिग्मचे संचालक रामंचद्रन कृष्णमूर्ती यांनी सांगितले की, ७ व्या वेतन आयोग २.५७ टक्के फिटमेंट फॅक्टर लागू केला होता. सरकार यामधील तफावत कमी करण्यासाठी थोडा जास्त गुणक विचारत घेऊ शकते.
कृष्णमूर्त यांनी सांगितले जर ८ व्या वेतन आयोगात २.० फिटमेंट फॅक्टरची शिफारस केली तर पगार दुप्पट होईल. एखाद्या कर्मचाऱ्याला ७व्या वेतन आयोगात ५०,००० रुपये पगार असेल आणि फिटमेंट फॅक्टर २.० लागू केले तर पगार दुप्पट म्हणजे १,००,००० होईल. त्यानंतर एचएआरए, वाहतूक भत्ता हे सर्व मोजले जातील. त्यामुळे फिटमेंट फॅक्टर किती असणार त्या आधारावर पगार किती होणार हे ठरणार आहे.









