पुणे : जी. के. फाऊंडेशन, पुणे आणि विश्वराज हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने गरीब व गरजू मुलांसाठी मोठी दिलासादायक घोषणा करण्यात आली आहे. ३ महिने ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना हृदय शस्त्रक्रिया तसेच इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करून देण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
या उपक्रमांतर्गत हृदयाला छिद्र असलेले, डिफेक्ट्समुळे त्रस्त असलेले तसेच तत्सम सर्व प्रकारच्या हृदयाच्या आजारांवर शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत.
📌 आवश्यक कागदपत्रे
-
रुग्णाचे व अर्जदाराचे आधारकार्ड
-
रुग्णाचे व अर्जदाराचे फोटो
-
उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाचा अंदाजपत्रक
-
रुग्णाचे शैक्षणिक प्रमाणपत्र (शिक्षण घेत असल्यास)
-
तहसीलदार कार्यालयाचा उपचार दायित्व प्रमाणपत्र
-
रुग्णाला झालेल्या आजाराचे सर्व रिपोर्ट
-
मागील ६ महिन्यांचे बँक स्टेटमेंट्स
-
बीपीएल प्रमाणपत्र
📌 संपर्कासाठी
श्री. गुंडप्पा खडके
अध्यक्ष, जी. के. फाऊंडेशन, पुणे
📞 7517510741
👉 या उपक्रमामुळे गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांना मोफत उपचारांची मोठी दिलासा मिळणार आहे.