पुणे : राज्यात गुन्ह्यांच्या मालिकेत आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील कात्रज बोगद्याजवळ २५ वर्षीय युवकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली असून, अवघ्या १२ तासांत राजगड पोलिसांनी या खुनाचा छडा लावून तीन अल्पवयीनांसह चार आरोपींना ताब्यात घेतले.
📍 घटना कशी घडली?
१९ ऑगस्ट रोजी सकाळी शिंदेवाडी (भोर) परिसरात एका अज्ञात मृतदेहाचा शोध लागला. तपासानंतर मृताची ओळख सौरभ स्वामी आठवले (२५, रा. मांगडेवाडी, मूळ सोलापूर) अशी पटली. नातेवाईकांनी एक दिवस आधीच हरवल्याची तक्रार दिली होती.
तपासादरम्यान समोर आले की, सौरभने आपल्या ओळखीच्या एका अल्पवयीन मुलीला बहीण मानलं होतं. मात्र त्याच मुलीशी एका अल्पवयीन मुलाचे प्रेमसंबंध होते. ही गोष्ट सौरभला कळल्यावर त्याने मुलीच्या कुटुंबीयांना सांगितले. यामुळे प्रेमसंबंधात दुरावा आला आणि रागाच्या भरात त्या अल्पवयीन मुलाने मित्रांच्या मदतीने सौरभचा खून करण्याचा कट रचला.
📌 खुनाची थरकाप उडवणारी पद्धत
सौरभला बोलावून डोंगरात नेण्यात आलं आणि कोयत्यासह इतर हत्यारांनी वार करून त्याचा खून करण्यात आला. पोलिसांनी श्रीमंत गुन्जे (२१), संगम क्षीरसागर (१९), नितीन शिंदे (१८) आणि दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं.
📱 पोलिसांनी आरोपींकडून ॲक्टिव्हा, स्प्लेंडर मोटारसायकल, काळ्या रंगाची बाईक आणि तीन मोबाईल जप्त केले आहेत. आरोपींना न्यायालयाने २८ ऑगस्ट २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
👮♂️ ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. राजेश गवळी व त्यांच्या पथकाने केली.