- नवीन आपे ई-सिटी अल्ट्रा २३६ किमी उच्च दर्जाची प्रमाणित रेंज देते, तसेच या वेईकलमध्ये ९.५५ केडब्ल्यू सर्वोच्च शक्ती, २८ टक्के ग्रेडेबिलिटी, बूस्ट मोड, सर्वोत्तम वैशिष्ट्ये, प्रबळ रचना दर्जा आणि क्लाइम्ब असिस्ट मोड आहे, जे उच्च दर्जाची कार्यक्षमता देते.
- नवीन आपे ई-सिस्टी एफएक्स मॅक्स १७४ किमी प्रमाणित रेंज देते, तसेच या वेईकलमध्ये ७.५ केडब्ल्यू शक्ती व ३० एनएम टॉर्क देते. ही वेईकल श्रेणीमधील सर्वोत्तम बॅटरी कार्यक्षमता आणि प्रीझमॅटिक सेल तंत्रज्ञानासह येते.
पियाजिओ वेईकल्स प्रायव्हेट लिमिटेड (पीव्हीपीएल) ही इटालियन ऑटो कंपनी पियाजिओ ग्रुपची १०० टक्के उपकंपनी आणि भारतातील लहान प्रवासी व व्यावसायिक वाहनांच्या आघाडीच्या उत्पादक कंपनीने नवीन २०२५ आपे इलेक्ट्रिक ईव्ही रेंज लाँच केली आहे. या लाँचमध्ये नवीन आपे ई-सिटी अल्ट्रा आणि नवीन आपे ई-सिटी एफएक्स मॅक्स या इलेक्ट्रिक वेईकल्सचा समावेश आहे. दोन्ही इलेक्ट्रिक तीन-चाकी ब्रँडच्या पॅसेंजर वेईकल पोर्टफोलिओला अधिक वाढवतात, जेथे लास्ट-माइल गतीशीलतेच्या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करत आहेत, तसेच उच्च दर्जाची कार्यक्षमता व विश्वसनीयता देतात.
आपे ई-सिटी अल्ट्रा टिकाऊपणा, संपूर्ण मेटल बॉडी, प्रगत १०.२ केडब्ल्यूएच एलएफपी बॅटरी आणि इंटेलिजण्ट टेलिमॅटिक्ससह वरचढ ठरते. ही वैशिष्ट्ये या वेईकलला शहरातील आव्हानात्मक कार्यसंचालनांसाठी शक्तिशाली, उच्च तंत्रज्ञान सोल्यूशन बनवतात. आपे ई-सिटी एफएक्स मॅक्स विभागातील अग्रगण्य ३० एनएम टॉर्क आणि समार्ट एनर्जी मॉनिटरिंगमुळे वरचढ ठरते, ज्यामधून दीर्घकाळपर्यंत बॅटरी टिकण्याची आणि सातत्यपूर्ण कार्यक्षमतेची खात्री मिळते.
याप्रसंगी मत व्यक्त करत पियाजिओ वेईकल्स प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. डिएगो ग्राफ़ी म्हणाले, “भारत इलेक्ट्रिक गतीशीलतेच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाटचाल करत आहे आणि तीनचाकी वाहने या परिवर्तनाचे नेतृत्व करत आहेत. आमचा विश्वास आहे की ईव्ही शहरी वाहतुकीला आकार देण्याची आणि उपजीविका सुधारण्याची संधी आहेत. नवीन आपे ई-सिटी अल्ट्रा आणि आपे ई-सिटी एफएक्स मॅक्स या वास्तविकता लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आल्या आहेत.
या वेईकल्स भारतीय ग्राहकांना आवश्यक असलेल्या गोष्टी पुरवतात: श्रेणीतील सर्वोत्तम श्रेणी, कमी बॅटरी डिग्रेडेशन, उत्तम कामगिरी आणि किमान ऑपरेटिंग खर्च. ही वाहने आर्थिक गतिशीलतेला चालना देणारी आहेत. तीनचाकी वाहनांच्या क्षेत्रातील ईव्हींची अग्रणी पियाजिओला शहरे आणि लहान नगरांमध्ये प्रगती करू शकणाऱ्या स्मार्ट, भविष्यासाठी सुसज्ज उपायांसह भारताच्या नेट-झिरो व्हिजनला पाठिंबा देण्याचा अभिमान आहे. आमचे नाविन्यतेसह अधिक सर्वसमावेशक आणि शाश्वत भविष्यासाठी योगदान देण्यावर देखील लक्ष केंद्रित आहे.”
याप्रसंगी मत व्यक्त करत पियाजिओ वेईकल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या सीव्ही डोमेस्टिक बिझनेस अँड रिटेल फायनान्सचे कार्यकारी उपाध्यक्ष श्री. अमित सागर म्हणाले, “इलेक्ट्रिक प्रवासी तीन चाकी वाहनांचा विभाग झपाट्याने विकसित होत आहे. ग्राहकांना जास्त रेंज, विश्वासार्ह बॅटरी लाइफ आणि कमी कार्यसंचालन खर्च देणारी वाहने हवी आहेत. या गरजा लक्षात घेत आपे ई-सिटी अल्ट्रा आणि आपे ई-सिटी एफएक्स मॅक्स डिझाइन करण्यात आल्या आहेत.
२३६ किमी प्रमाणित रेंज, उत्तम पॉवर डिलिव्हरी आणि कमीत-कमी डिग्रेडेशनसह उद्योगातील सर्वोत्तम बॅटरी तंत्रज्ञान असलेल्या या वेईकल्स शहरातील आव्हानात्मक वाहतूकीमध्ये दैनंदिन वापरासाठी डिझाइन करण्यात आल्या आहेत. या वेईकल्स ५ वर्षे/२,२५,००० किमीच्या सर्वोत्तम वॉरंटीसह देखील येतात, ज्यामधून अतिरिक्त हमी मिळते. आम्हाला विश्वास आहे की ही उत्पादने कमी चार्जिंग खर्च, कमी देखभाल आणि जास्त अपटाइममुळे वापरकर्त्यांच्या उपजीविकेला आधार देतील, ज्यामुळे या वेईकल्स फायदेशीर आणि शाश्वत गतीशीलतेसाठी स्मार्ट पर्याय बनतील.”
नवीन आपे ई-सिटी अल्ट्रा उच्च कार्यक्षमतेसाठी डिझाइन करण्यात आली आहे, या वेईकलमध्ये अनेक शक्तिशाली वैशिष्ट्ये आहेत:
- २३६ किमी दर्जात्मक प्रमाणित रेंज.
- ९.५५ केडब्ल्यू सर्वोच्च शक्तीसह जलद पिकअप आणि ४५ एनएमचे शक्तिशाली टॉर्क.
- अव्वल गती ५५ किमी/तास, ज्यामधून जलद ट्रिप्स आणि उच्च टर्नअराऊंड कार्यक्षमता मिळते.
- २८ टक्के ग्रेडेबिलिटी, जी उड्डाणपुलांवर व डोंगराळ भागातील रस्त्यांवर ड्रायव्हिंग करण्यासाठी अनुकूल आहे.
- आवश्यक असताना त्वरित पॉवरसाठी क्लाइम्ब असिस्ट मोड.
- जलद चार्जिंग आणि कमी डाऊनटाइमसाठी ३ केडब्ल्यू चार्जरसह १०.२ केडब्ल्यूएच एलएफपी बॅटरी.
- श्रेणीमधील अग्रगण्य ५-वर्ष / २,२५,००० किमी वॉरंटी.
- डिजिटल स्पीडोमीटर, ज्यावर बॅटरी लेव्हल (एसओसी), रेंज (डीटीई), गती आणि सिस्टम अलर्ट्स पाहायला मिळतात.
- स्मार्ट ४जी टेलिमॅटिक्ससह लाइव्ह ट्रॅकिंग, जिओ-फेन्सिंग आणि रिमोट इम्मोबिलायझेशन.
- प्रबळ रचना दर्जासह शक्तिशाली मेटल बॉडी.
आपे ई-सिटी एफएक्स मॅक्स हे पियाजिओचे विश्वसनीय इलेक्ट्रिक मॉडेल आता सुधारित शक्ती व रेंजसह येते:
- प्रतिचार्ज १७४ किमी प्रमाणित रेंज
- ७.४ केडब्ल्यूची सर्वोच्च मोटर शक्ती.
- १९ टक्के ग्रेडेबिलिटीसह ३० एनएमचे टॉर्क आऊटपुट.
- ८.० केडब्ल्यूएच बॅटरी काळासह सातत्याने एनर्जी आऊटपुट देते.
- प्रीझमॅटिक सेल तंत्रज्ञान किमान बॅटरी असंतुलन आणि विस्तारित टिकाऊपणाची खात्री देते.
- बॅटरी डिग्रेडेशनवर नियंत्रणासाठी स्मार्ट एनर्जी मॉनिटरिंग.
आपे ई-सिटी एफएक्स मॅक्स ३,३०,००० रूपये या सुरूवातीच्या किमतीमध्ये आणि आपे ई-सिटी अल्ट्रा ३,८८,००० रूपयांमध्ये लाँच करण्यात आली आहे. दोन्ही किमती एक्स-शोरूम, भारत आहेत. दोन्ही मॉडेल्स भारतभरातील पियाजिओ डिलरशिप्समध्ये उपलब्ध असतील.