Sanjay Jagtap : संजय जगताप यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची सदिच्छा भेट

Sanjay Jagtap : संजय जगताप यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची सदिच्छा भेट

नवी दिल्ली : पुरंदरचे माजी आमदार मा. संजय जगताप यांनी अलीकडेच भारतीय जनता पक्षात (भाजप) अधिकृत प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशानंतर विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज सहकार आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधर मोहोळ यांची संजय जगताप यांनी सदिच्छा भेट घेतली.

या भेटी दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी श्री. जगताप यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केल्याबद्दल समाधान व्यक्त करत, पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.

भेटीदरम्यान महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचा विकास, पुरंदर तालुक्याच्या प्राधान्यक्रमातील प्रश्न, नागरी विमान वाहतूक प्रकल्पांचे संभाव्य विस्तार आणि सहकार क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवरही सकारात्मक चर्चा झाली.

संजय जगताप यांनीही या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की, “भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नेतृत्वाकडून मिळणारा पाठिंबा आणि मार्गदर्शन मला अधिक प्रेरणा देत आहे. मा. मोहोळ साहेबांसोबत झालेली चर्चा ही प्रेरणादायी असून, त्यांच्या शुभेच्छा माझ्यासाठी मार्गदर्शक ठरतील.”

या भेटीमुळे संजय जगताप यांच्या राजकीय प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा अधोरेखित झाला असून, भाजपमधून त्यांच्या पुढील वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.