Today’s Horoscope
♈ मेष : चंद्र आज आपल्या राशीत आहे, त्यामुळे आत्मविश्वास आणि ऊर्जा भरपूर राहील. प्रत्येक कामात जोश जाणवेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. मित्रमंडळींसोबत वेळ छान जाईल. आईकडून लाभ संभवतो. छोट्या प्रवासाची शक्यता आहे.
♉ वृषभ : चंद्र बाराव्या भावात आहे. मनात नकारात्मक विचार येऊ शकतात. तब्येत थोडी नरम राहील. खर्च वाढेल. घरातील जबाबदाऱ्या त्रासदायक वाटतील. वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याने वाणीवर नियंत्रण ठेवा.
♊ मिथुन : चंद्र लाभ स्थानात आहे. आर्थिक दृष्ट्या शुभ दिवस. मित्रांकडून मदत व आनंद मिळेल. संततीसंबंधी चांगल्या बातम्या येतील. विवाहेच्छुकांसाठी अनुकूल वेळ. सामाजिक व व्यावसायिक लाभ संभवतो.
♋ कर्क : चंद्र दशम स्थानात असल्यामुळे नवा उत्साह येईल. घरगुती खरेदी कराल. नोकरीत बढती किंवा व्यवसायात यश मिळेल. प्रतिष्ठा वाढेल. सरकारी लाभाची शक्यता. घरात शांतता आणि समाधान नांदेल.
♌ सिंह : भाग्यस्थानातील चंद्र थोडासा आळस आणि थकवा देऊ शकतो. मन बेचैन राहील. यशासाठी विशेष मेहनत घ्यावी लागेल. प्रवास टाळणे योग्य. नकारात्मक विचार दूर ठेवा आणि आत्मविश्वास ठेवा.
♍ कन्या : आज संयमाची गरज आहे. नवीन कामे सुरू करणे टाळा. क्रोध आणि आवेश टाळा. जवळच्या व्यक्तींशी मतभेद संभवतात. प्रवास शक्यतो टाळा. शांत राहणे आणि संयम ठेवणे हितावह ठरेल.
♎ तूळ : संसारिक आनंदाची अनुभूती घ्याल. कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा बेत होईल. व्यावसायिक क्षेत्रात प्रगती होईल. सामाजिक सन्मान व लोकप्रियता मिळू शकते. वेळ लाभदायक ठरेल.
♏ वृश्चिक : अचानक काही अडचणी उद्भवू शकतात. नियोजित भेटी रद्द होण्याची शक्यता. घरगुती वाद, मतभेद आणि खर्च वाढतील. संयम ठेवा. मन शांत ठेवणे गरजेचे आहे. विशेष काळजी घ्या.
♐ धनु : संततीच्या शिक्षणाबाबत चिंता वाटेल. आरोग्याच्या बाबतीत पचनसंस्थेची तक्रार होऊ शकते. कामात यश मिळवण्यासाठी संयम आवश्यक. प्रेमसंबंध मधुर होतील. लेखन, कला यामध्ये रस वाटेल.
♑ मकर : मनःस्थिती थोडी अस्वस्थ राहील. कौटुंबिक वाद उद्भवतील. आरोग्याकडे लक्ष द्या, छातीत त्रास जाणवू शकतो. कामात अडथळे येतील. अपघाताची शक्यता असल्यामुळे सतर्क राहा.
♒ कुंभ : आजचा दिवस आनंददायक ठरेल. चिंता दूर होतील. भावंडांसोबत सहलीचा बेत आखू शकता. सामाजिक आणि कौटुंबिक आयुष्यात समाधान. विरोधकांवर विजय मिळवू शकाल. सौख्यदायी दिवस.
♓ मीन : खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. रागावर व वाणीवर संयम ठेवा. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. मन थोडं अस्वस्थ राहू शकतं. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे.