सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ७७ ठिकाणी, तर पुणे जिल्ह्यात 7 ठिकाणी भावपूर्ण वातावरणात ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ संपन्न !

खरे हिंदुत्व काय असते हे मला सनातन संस्थेमुळे समजले – श्री.शेखर मुंदडा, अध्यक्ष, महाराष्ट्र गोसेवा आयोग

पुणे – काही वर्षांपासून मी अनेक संस्था, संघटनांशी जोडला गेलेलो आहे, त्या माध्यमातून माझे कार्य चालू आहे. पण खरे हिंदुत्व म्हणजे काय असते हे मला सनातन संस्थेमुळे समजले. ‘सनातन संस्थेच’ कार्य अद्भुत आहे. साधकांची श्रद्धा मी शब्दात वर्णन करू शकत नाही. आपण वेगवेगळे डे साजरे करतो परंतू आजचा दिवस अतिशय महत्वाचा असून गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण ‘सेवेचा’ संकल्प घेऊया असे आवाहन महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री.शेखर मुंदडा यांनी कोथरूड येथील १० जुलै २०२५ रोजी संपन्न झालेल्या गुरूपौर्णिमा महोत्सवात केले. 

                                    

 

तसेच या ठिकाणी ‘आदर्श शिष्य कैसे बने ?’ या ई बुकचे प्रकाशन करण्यात आले. यंदा गुरुपौर्णिमा महोत्सव देशभरातील ७७ ठिकाणी आणि पुणे शहरात 7 ठिकाणी साजरा करण्यात आला.    

 

 

हिंदुराष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्याला अध्यात्मिक साधनेची जोड हवी – श्री दादा वेदक, विश्व हिंदू परिषद

आपल्याला हिंदुराष्ट्र हवे असेल तर ‘आदर्शरित्या कसे जगायला हवे’ याचे शिक्षण आपण द्यायला हवे, आपले आचार, उच्चार आणि विचार हे आदर्श असायला हवेत. आणि त्यासाठी आपल्या कार्याला अध्यात्मिक साधनेची जोड हवी. सनातनचे साधक त्याप्रमाणे आदर्श जीवन जगत आहेत. आपण सर्वांनी संघटित झाले पाहिजे. समाजाला धर्मशिक्षण द्यायला पाहिजे. आनंद आणि शांती हि सत्संगातूनच भेटेल असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे श्री.दादा वेदक यांनी केले. ते चिंचवड (पुणे) येथील ‘समीर बँक्वेट अँड लॉन्स’या ठिकाणी गुरुवार, १० जुलै २०२५ रोजी संपन्न झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात बोलत होते. 

 

 

 

सद्यस्थितीत हिंदूंचे प्रभावी संघटन आवश्यक – श्री. संजय थोरात, भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष

 

 

आज समाज भरकटला आहे. आपले संस्कार विसरत चालला आहे. त्यामुळे हिंदूंची स्थिती दयनीय झाली आहे. आपले संस्कार आपण विसरल्याने आपला समाज दिशाहीन झाला आहे. त्यासाठी समाजाला धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे. हिंदुनी काळाच्या अनुसार संघटनाला महत्व द्यायला हवे असे प्रतिपादन भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री. संजय थोरात यांनी जुन्नर (पुणे) येथील गुरूपौर्णिमा महोत्सवात बोलताना केले. 

 

 

गुरुदेवांच्या कार्यात मुंगीच्या वाट्याने नाही सिंहाच्या वाट्याने उभे राहावे – सौ. उज्ज्वल गौड, भाजप महिला मोर्चा, पुणे सरचिटणीस

गुरुदेवांचे स्मरण होताच डोळ्यातील अश्रू आणि हृदय त्यांच्याजवळ गेलेले असते असा भाव निर्माण होतो. ज्या व्यक्तीची साधना नसेल, ज्यांना सनातन धर्म माहीत नसेल अशांसाठी येणारा काळ अडचणींचा आहे. प्रत्येकाने सेवार्थ कसे राहावे कोणती साधना आणि सेवा करावी याचे मार्गदर्शन सनातन संस्था आणि सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले करत आहेत. जेव्हा गुरूंनी हात धरलेला असतो त्यावेळी मनुष्य भरकटू शकत नाही आणि हीच गुरुदेवांनी दिलेली शिदोरी आहे त्यांनी दिलेली शिकवण आहे. गुरुदेवांच्या कार्यात मुंगीच्या वाट्याने नाही सिंहाच्या वाट्याने उभे राहावे असे असे आवाहन भाजप महिला मोर्चाच्या पुणे सरचिटणीस सौ. उज्ज्वल गौड यांनी सिद्धार्थ हॉल,सिंहगड रस्ता येथील महोत्सवात व्यक्त केले.

मंदिरांचे सरकारीकरण रोखण्यासाठी सर्व हिंदूंनी संघटित होऊन प्रयत्न करावे ! – ह.भ. प. उमेश महाराज शिंदे, संस्थापक अध्यक्ष, गुरुकुलधाम, शिंद

 

आज हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण होत आहेत तसेच हिंदूंच्या मंदिरांमधे पावित्र्य राखले जात नाही. मंदिरांचे पावित्र्य राखण्यासाठी आणि ती सुरक्षित ठेवण्यासाठी मंदिरे भक्तांच्या स्वाधीन असणे आवश्यक असून मंदिरे ही आता धर्मशिक्षणाची केंद्रे बनली पाहिजे यासाठी हिंदूंनी संघटित होऊन प्रयत्न करायला हवे असे मत ह.भ. प. उमेश महाराज शिंदे यांनी भोर येथील महोत्सवात व्यक्त केले.

 

 

ईश्वराचा सेवक या भावाने आपल्या भागातील मंदिरांचे व्यवस्थापन होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – श्री. दिलीप देशमुख, माजी धर्मादाय आयुक्त

 

ईश्वराचा सेवक या भावाने आपल्या भागातील मंदिरांचे व्यवस्थापन होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे तरच आपली मंदिरे ही आपल्या धर्मासाठी प्रेरणास्थाने होतील असे मत माजी जिल्हा न्यायाधीश आणि माजी धर्मादाय आयुक्त श्री. दिलीप देशमुख यांनी तळेगाव येथील अपूर्वा गार्डन मंगल कार्यालय येथील महोत्सवात व्यक्त केले. या महोत्सवात श्री. दिलीप देशमुख यांनी मंदिर विश्वस्तांचे दायित्व, विश्वस्त म्हणजे काय? याविषयी उपस्थितांना अवगत केले. 

 

 

 

हिंदुराष्ट्र स्थापनेसाठी शारीरिक व मानसिक स्तरावर सिद्ध होणे आवश्यक – श्री. विवेक सिन्नरकर, लेखक, कीर्तनकार

         

ईश्वराने अवतार घेऊन शिकवले कि संपूर्ण आयुष्य धर्माच्या उभारणीसाठी वेचले पाहिजे. सर्वस्वाचा त्याग केला पाहिजे हि शिकवण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रातून मिळते. सणवार उत्सव हे केवळ पूजेचे दिवस नसून एक वैचारिक ठेवा आहे. गुरुपौर्णिमा हा त्यातीलच १ दिवस आहे. आपल्याला आता हिंदूंमध्ये चेतना निर्माण करायला पाहिजे. शारीरिक व मानसिक स्तरावर सिद्ध व्हायला पाहिजे तसेच सीमेवर लढणारा व हरिभक्ती करणाराही पाहिजे. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी हिंदूंचे संघटन, धर्मशिक्षण यावर फार मोलाचे कार्य केले आहे. असे प्रतिपादन लेखक, कीर्तनकार, वास्तुविशारद श्री. विवेक सिन्नरकर यांनी विणकर सभागृह, पद्मावती, पुणे येथे गुरुपौर्णिमा महोत्सवात केले.    

    

 

 

प्रारंभ श्री व्यासपूजन आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमापूजनाने झाला. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या संदेशाचे वाचन केले गेले. ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ या विषयावर प्रेरणादायी व्हिडिओ प्रक्षेपण करण्यात आले. रामराज्य स्थापनेसाठी संकल्प व सामूहिक नामजपयज्ञ करण्यात आला. 

 

 

    

 धर्म, अध्यात्म, साधना, बालसंस्कार, आचारधर्म, आयुर्वेद, प्रथमोपचार, स्वसंरक्षण, हिंदु राष्ट्र आदी विषयांवरील ग्रंथप्रदर्शन आणि फलक प्रदर्शन लावण्यात आले होते.यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला.