Bharat Bandh On 9th July : केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात आज (बुधवार, ९ जुलै २०२५) देशातील १० केंद्रीय कामगार संघटनांनी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. आज देशभरात निषेध प्रदर्शन होणार आहे. संपूर्ण देशभरातील २५ कोटींहून अधिक कर्मचारी आणि कामगार आजच्या भारत बंदमध्ये सहभागी होणार आहेत. (Why are 10 trade unions protesting against central government policies?)
आज होणाऱ्या भारत बंदचा देशभरात मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. या राष्ट्रव्यापी संपामुळे देशातील आर्थिक, शैक्षणिक आणि अनेक प्रमुख संस्था व सेवांवर परिणाम (Which Services Will Be Affected?) होईल. यामध्ये बँकिंग, विमा, टपाल आणि कोळसा खाणकाम यासारख्या अनेक क्षेत्रांतील कामगार सहभागी होतील. कामगार संघटनांच्या मंचाने यासंदर्भात एक निवेदन जारी केलेय.
मागील १० वर्षांपासून सरकारने वार्षिक कामगार परिषद आयोजित केलेली नाही. याशिवाय, सातत्याने असे अनेक निर्णय घेतले जात आहेत, जे कामगारांच्या हिताविरुद्ध आहेत, असे कामगार संघटनाने म्हटले आहे. (Banking, Transport, Education Hit as 10 Unions Protest Against Centre)
बँकिंग सेवा –
आरबीआयकडून कोणत्याही अधिकृत बंदची घोषणा करण्यात आलेली नाही. पण तरीही बँक कर्मचारी आज होणाऱ्या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे बँकिंग सेवावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे.
वाहतूक –
आज होणाऱ्या भारत बंद मध्ये सार्वजनिक वाहतूकही विस्कळीत होणार आहे. राज्य सरकारकडून याबाबत कोणतीही बंदची घोषणा करण्यात आलेली नाही. पण यूनियन, संघटना या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो.
पोस्ट ऑफिस –
भारतीय डाक सेवा अर्थात पोस्ट ऑफिसच्या कामावर आजच्या बंदवर मोठा परिणाम होऊ शकतो.
भारत बंदचा परिणाम देशभरातील शाळा-कॉलेज, बाजार आणि खासगी कार्यलयात दिसून येऊ शकतो. देशातील परिवहन सेवांच्या संबंधित लोक भारत बंदमध्ये सामील होणार आहेत, त्यामुळे शाळा-कॉलेजला जाण्यासाठी अडचणी येऊ शकतात. बंद असल्याचा परिणाम बाजारावरही दिसू कतो. खासदी कार्यलयावर परिणाम होणण्याची शक्यता कमीच आहे.
कोळसा खाणकाम आणि कारखाने
या संपात कोळसा आणि गैर-कोळसा खनिजांचे कारखाने आणि संघटना देखील सहभागी होतील. यामुळे केवळ या सेवांमध्येच नव्हे, तर कोळशावर अवलंबून असलेल्या इतर सेवांमध्येही अडथळे येऊ शकतात.
भारतीय मजदूर संघ आज होणाऱ्या भारत बंदमध्ये सहभागी होणार नाही. महामंत्री रविंद्र हिमते यांनी मंगळवारी याबाबत सांगितले. ते म्हणाले की, भारत सरकारने देशातील प्रभावी २९ कामगार कायद्यांच्या जागी २०१९ आणि २०२० मध्ये चार नवीन कामगार संहिता तयार केल्या. यापैकी दोन कामगार संहितांना भारतीय मजदूर संघाने पाठिंबा दिला आहे.
आज होणाऱ्या देशव्यापी भारत बंदला इंडिया आघाडी पाठिंबा देत आहे. आज सकाळी ९:३० वाजता काँग्रेस खासदार राहुल गांधी बिहारची राजधानी पाटणा येथे इनकम टॅक्स गोलंबरपासून वीरचंद पटेल पथ, शहीद स्मारक मार्गे निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत पायी मोर्चा आणि निषेध प्रदर्शनात सहभागी होतील.