उरुळी कांचन येथे टेम्पोने सहा जणांना चिरडले; २ जणांचा जागीच मृत्यू , ४ जण गंभीर जखमी

नितीन करडे : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील तळवाडी चौकात टेम्पोने गावी जाणाऱ्या सहा जणांना उडवुन चिरडले. यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असुन चार जण गंभीर जखमी झाले असल्याची घटना घडली आहे.

उरुळी कांचन येथे (ता. ०२ जून) बुधवार रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तळवडी चौकात काही लोक हे आपल्या गावी जाण्यासाठी थांबले असताना एक अशोक लेलँड कंपनीचा छोटा हत्ती गाडी क्र. एम एच- ४५- १८७९ (पूर्ण नंबर समजून शकला नाही) या टेम्पोने थांबलेले लोकांना भरधाव वेगाने येऊन धडक देऊन चिरडून पुणे सोलापूर महामार्गावरुन सोलापूर च्या दिशेने पसार झाला. या अपघातात एकुण सहा जणांना उडवले.

मृत्यू झाल्यांची नावे- 1) अशोक भीमराव (वय २५ वर्ष, रा. बसनाळ सावली बिदर कर्नाटक). 2) मेहबूब रहमान मियाडे (वय ६७ वर्ष) रा. माकर वस्ती सहजपुर ता. दौंड जिल्हा पुणे. या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

जखमींची नावे – 1) भारती लक्ष्मण बापूराव रा. आश्रम रोड उरुळी कांचन -ता. हवेली, पुणे. 2) मैनुद्दीन लालमिया तांबोळी (वय ६७ वर्षे रा. आंबा पिंपळगाव, लातूर) 3) वैशाली भागवत बनसोडे (वय ४० वर्ष रा. सोरतापवाडी ता. हवेली, पुणे) ४) भागवत बनसोडे वय- ४५ वर्ष, हे तीन जण गंभीर जखमी झाले आहे.

अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते अक्षय कांचन यांचा मित्रपरिवार व धनंजय लोहार सह ग्रामस्थांनी रुग्णवाहिका बोलून जखमींना पुढील उपचारासाठी उरुळी कांचन येथील खासगी रुग्णालय सिद्धिविनायक हॉस्पिटल व विठ्ठल हॉस्पिटल येथे दाखल केले. यातील अपघात करून पसार झालेल्या वाहननाचा तपास उरुळी कांचन पोलीस करीत आहेत.