सनातन संस्था आयोजित सामाजिक उपक्रम संपन्न

By: Editor _2

On: Tuesday, June 24, 2025 2:24 PM

Google News
Follow Us
सनातन संस्था या न्यासाच्या वतीने पुणे शहरातील मंगळवार पेठ येथे  वारकऱ्यांना फळे वाटप उपक्रमाचे आयोजन ! 
पुणे – आनंदी जीवनाचा मार्ग यासाठी कार्यरत असणारी सनातन संस्था समाजामध्ये अनेकविध उपक्रमांचे आयोजन करते. याचप्रमाणे समाजात  ठिकठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते यामध्ये गरजुंना अन्नदान, कपडे वाटप, शालेय साहित्य वाटप असे निरनिराळे उपक्रम घेतले जातात.याचा समाजात अधिकाधिक लाभ होत असतो. याचाच एक भाग म्हणून २१ जून या दिवशी पुणे शहरातील मंगळवार पेठ  येथे वारकऱ्यांना फळे वाटप या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. याचा लाभ वारीमधील सहभागी १२० हुन अधिक वारकऱ्यांनी लाभ घेतला. सनातन संस्था करत असलेले कार्य खूपच चांगले असल्याचे मत सहभागी झालेल्यांची व्यक्त केले.हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी सौ. वैशाली गुजर, सौ. जया वाव्हळ, सौ. प्राजक्ता काळे, सौ. वसुधा दीक्षित यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

OPPO India

April 27, 2026

OPPO India

April 27, 2026

April 27, 2026

April 27, 2026

Sbi एसबीआय

April 25, 2026

April 24, 2026