Sharad Mohol : तेव्हापासून आरोपी धुमसतच होते… शरद मोहोळ हत्याप्रकरणातील सर्वात धक्कादायक माहिती उघड

पुणे | पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळवर (Sharad Mohol) शुक्रवारी दुपारी कोथरूडमधल्या सुतारदरा या ठिकाणी गोळीबार झाल्याची बातमी आली आणि गुन्हेगारी विश्वात एकच खळबळ उडाली. जखमी शरद मोहोळ या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता. सुरवातीला त्याला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथून त्याला ससूनला हलवलं. मात्र काही तासातच गंभीररित्या जखमी असलेल्या मोहोळचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आणि ही बातमी पुणे शहरासह संपूर्ण राज्यात वाऱ्यासारखी पसरली.. दिवसाढवळ्या भर रस्त्यात कुख्यात गुंडाला गोळ्या घालत त्याची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली

तरुणाचा खासगी भाग महिलेने कापला; चौकशी सुरू; पहा Video

खरंतर ज्या दिवशी हे हत्याकांड झालं तो दिवस म्हणजे 5 जानेवारी, त्याच दिवशी शरद मोहोळचा लग्नाच्या वाढदिवस होता. त्याच्या घरातून जेवल्यावर बाहेर पडलेल्या आरोपींनी शरद मोहोळवर घराजवळच तीन ते चार गोळ्या झाडल्या. त्यातली एक गोळी शरद मोहोळच्या खांद्याला लागली. दिवसाढवळ्या झालेल्या हत्येनंतर पुण्यात दहशतीचं वातावरण होतं. गोळ्या झाडून आरोपी तेथून लागलीच पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळ याला उपचारांसाठी रुग्णालयात तर दाखल केले, पण तेथेच त्याचा मृत्यू झाला.

मोठी बातमी : ऑनलाइन गर्लफ्रेंड स्कीमचा पर्दाफाश; राज्य हादरलं

शरद मोहोळ याच्या हत्येने पुण्यात खळबळ माजली, या हत्याकांडाने अनेकांना धक्का बसला. पण मिळालेल्या माहितीनुसार, हे काहीही अचानक घडलेलं नाही. या खुनाचा कट महिनाभरापासून शिजत होता. विशेष म्हणजे शरद मोहोळच्या जवळचीच माणसे हा कट रचत होते आणि याचा शरद मोहोळला जरासुद्धा सुगावा लागला नाही. शरद मोहोळ याचा खून करणारी त्याच्याच जवळची होती हे पोलीस तपासातून निष्पन्न झाले आहे.

Trending News Today : बॉयफ्रेंडला रात्री घरी बोलवायची, शंका येऊ नये म्हणून आई-वडिलांना द्यायची झोपेच्या गोळ्या, 3 महिन्यांनंतर…

दहा वर्षांपूर्वी शरद मोहोळ आणि आरोपींचे भांडण झाले होते. त्यावेळी आरोपी लहान होते. तेव्हा शरद मोहोळने त्यांना मारहाण केली होती. शरद मोहोळ आणि आरोपी एकाच परिसरात राहण्यासाठी असल्याने त्यांना शिवीगाळ करणे, मारहाण करणे, चारचौघात अपमान करणे अशी कृत्य शरद मोहोळकडून वारंवार होत होती. त्याचाच राग आरोपींच्या मनात धुमसत होता. त्यामुळे त्यांनी फार पूर्वीच बदला घेण्याचे ठरवले होते. त्यातूनच हत्येचा हा कट रचला. शरद मोहोळच्या लग्नाच्या वाढदिवशी घरात जेवल्यानंतर आरोपींनी त्याच्या घराजवळच गोळ्या झाडून हत्या केली.

Brother want Marry Sister : बहिणीशीच लग्न करण्याचा भावाचा बालहट्ट, विरोध केल्याने उचललं भयानक पाऊल

या सगळ्या प्रकरणी पुणे पोलिसांकडून याप्रकरणी आत्तापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आलीये. साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर, विठ्ठल गडले, अमित उर्फ अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गाव्हणकर आणि दोन अॅड. रवींद्र पवार आणि संजय उडान अशी या आरोपींची नावं आहेत. हे सगळे आरोपी शरद मोहोळची हत्या करून पुण्यातील खेड शिवापुर टोलनाकाच्या जवळ असणाऱ्या एका जागी थांबले हो.ते पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापा-टाकत आठही जणांना अटक केली असून या आरोपींना आता पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली आहे.

Sharad mohol murder case : शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपी वकिल ढसाढसा रडले, कारण…

दरम्यान या सगळ्या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणाऱ्या गृह खात्यावर पर्यायाने फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तर दुसरीकडे भाजपच्या पदाधिकारी आणि शरद मोहोळ यांच्या पत्नी स्वाती मोहोळ यांनी आज पुण्यात देवेंद्र यांची भेट घेत मला न्याय मिळायला हवा अशी मागणी केली आहे

पत्नीला राजकारणात लॉन्च केल्यानंतर शरद मोहोळ छोटा राजनप्रमाणे हिंदुत्ववादी डॅान म्हणून ओळख सांगण्याचा प्रयत्न करू लागला .हिंदुत्ववादी संघटनांच्या व्यासपीठावर कार्यक्रमांना हजेरी लावणे , विविध हिंदू सणांना मोठे कार्यक्रम आणि उत्सव साजरा करणे आणि पुढे राजकीय महत्त्वकांक्षासाठी गुन्हेगारी करावयादेखील शरद मोहोळ कडून थांबवण्यात आल्या होत्या.. मात्र गुन्हेगारी सोडलेल्या कुख्यात गुंड शरद मोहोळचा असा शेवट होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं.

Sharad-Mohol-Munna-Kolekar-Namde