प्रोवॉच’च्या वतीने प्रोवॉच झेडएन आणि प्रोवॉच व्हीएन स्मार्टवॉच बाजारात

पुणे,२३ एप्रिल, २०२४: लावा इंटरनॅशनलचा उप-ब्रँड प्रोवॉने,प्रोवॉच झेडएन आणि प्रोवॉच व्हीएन या दोन मॉडेल्सच्या अनावरणासह स्मार्टवॉच क्षेत्रात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे.

प्रोवॉच झेडएन स्मार्टवॉच मध्ये  सेगमेंट-फर्स्ट कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ संरक्षण आणि सतत हृदय गतीच्या देखरेखीसाठी उच्च-अचूकता पीपीजी सेन्सरसह ही आधुनिक अभियांत्रिकी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.  त्याची सुरुवातीची किंमत फक्त रु. २,५९९ असणार आहे. प्रोवॉच झेडएन व्यावहारिक फिरत्या मुकुटासह एक आकर्षक गोलाकार डायल,४६६ * ४६६ च्या रिझोल्यूशनसह १.४३-इंच AMOLED डिस्प्ले, सर्वसमावेशक आरोग्य ट्रॅकिंग क्षमता याचा समावेश करण्यात आला आहे. सामान्य वापराअंतर्गत ७ दिवसांपर्यंतच्या बॅटरीच्या आयुष्यासह, वापरकर्ते त्यांच्या आरोग्याच्या मेट्रिक्सचे चोवीस तास निरीक्षण करू शकतात.

प्रोवॉच व्हीएन स्मार्टवॉच मध्ये ड्रिफ्ट ब्लू, मूर ब्लॅक आणि गल ग्रे यासह व्हायब्रंट रंग प्रकारांमध्ये उपलब्ध, प्रोवॉच व्हीएन शैली आणि पदार्थ यांचे संयोजन करते. प्रोवॉच व्हीएन रु. १,९९९ च्या खास लॉन्च किंमतीत उपलब्ध आहे. यामध्ये ३२० * ३८६ रिझोल्यूशन आणि ५०० निट्स ब्राइटनेससह व्हायब्रंट १.९६-इंच टीएफटी २.५ डी कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला आहे. यात सहज नेव्हिगेशनसाठी वापरकर्त्यासाठी अनुकूल स्क्रोल बटण, हँड्स-फ्री सहाय्यासाठी इनबिल्ड व्हॉईस असिस्टंट, १५० हून अधिक कस्टमाईज्ड वॉच फेसेस आणि सर्वसमावेशक फिटनेस ट्रॅकिंगसाठी ११५ हून अधिक इन-बिल्ट स्पोर्टस् मोडची सुविधा आहेत.

प्रोवॉच झेएन आणि प्रोवॉच व्हीएन हे दोन्ही अॅमेझॉन, लावा ई-स्टोअर आणि लावा रिटेल नेटवर्कवर २६ एप्रिलपासून दुपारी १२ वाजता खरेदीसाठी उपलब्ध असतील. प्रत्येक स्मार्टवॉच २ वर्षाच्या वॉरंटीसह येते. तसेच देशभरातील ७०० + लावा सेवा केंद्रांपैकी कोणत्याही केंद्रावर सेवा दिली जाऊ शकते.