बापरे! सुप्रिया सुळेंच्या डोक्यावर सुनेत्रा पवार, पार्थ यांचे ५५ लाखांचे कर्ज; पहा किती संपत्ती…

बापरे! सुप्रिया सुळेंच्या डोक्यावर सुनेत्रा पवार, पार्थ यांचे ५५ लाखांचे कर्ज; पहा किती संपत्ती…

शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे सध्या देशभरात चर्चेत आहेत. त्यांच्याविरोधात त्यांचीच वहिणी सुनेत्रा पवार लढत आहेत. अवघ्या देशाचे लक्ष या बारामती मतदारसंघाकडे लागले आहे. आज सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांनी आपापली संपत्ती जाहीर केली आहे. सुप्रिया सुळेंची संपत्ती त्यांनी जाहीर केली आहे. परंतु, त्यात एक बाब लक्ष वेधून घेणारी आहे ती म्हणजे सुळे यांनी अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार यांच्याकडून ५५ लाख रुपये उधार घेतले आहे.

विश्वास बसणार नाही, परंतु सुळे यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार सुप्रिया यांनी पार्थ पवारांकडून २२ लाख रुपये आणि सुनेत्रा पवार यांच्याकडून ३५ लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचे म्हटले आहे. आणि महत्वाचे म्हणजे सुळेंच्या डोक्यावर एवढेच काय ते कर्ज आहे. सुळे यांनी प्रतिज्ञापत्रात त्यांची १४२ कोटींची मालमत्ता असल्याचे म्हटले आहे. तर शेतीतून सुळे यांना यंदा शून्य रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांची ११४ कोटी रुपयांची संपत्ती आहे. सुप्रिया यांच्याकडे कोणतीही कार नाही. आयकर विवरणाप्रमाणे सुळे यांचे उत्पन्न 1 कोटी 78 लाख 97 हजार 460 रुपये एवढे आहे. 42 हजार 500 रुपये रोख रक्कम, बँक खात्यातील ठेवी 11 कोटी 83 लाख 29 हजार 195, शेअर बाजारात 16 कोटी 44 लाख 24 हजार 140 रुपये गुंतवणूक, राष्ट्रीय बचत योजनेत 7 लाख 13 हजार 500 रुपये एवढी गुंतवणूक आहे.

तर सुप्रिया सुळे यांनी 3 कोटी 50 लाख 86 हजार 080 रुपयांचे कर्ज म्हणून दिले आहे. तर सदानंद सुळे यांनी 60 कोटी 8 लाख 71 हजार 253 रुपये कर्ज म्हणून दिलेले आहेत. दोघांकडेही एकही कार, वाहन नाही. सुप्रिया सुळेंकडे 1 कोटी 1 लाख 16 हजार 18 रुपयांचे सोने आहे. एक कोटी 56 लाख 06 हजार 321 रुपयांचे हिऱ्याचे दागिने आहेत. सुळेंकडे 9 कोटी 15 लाख 31 हजार 248 रुपये एवढ्या किंमतीची शेत जमिन आहे. जंगम मालमत्ता 38 कोटी 06 लाख 48 हजार 431 रुपये एवढी आहे.