लेटेस्ट इलेक्ट्रिक कार पंच ईवीवर डिस्काऊंट; पंच ईवी खरेदी कराची आहे हि भारी संधी!

टाटा मोटर्सने आपली लेटेस्ट इलेक्ट्रिक कार पंच ईवीवर डिस्काऊंट जाहीर केलाय. इलेक्ट्रिक पंचला कमी किंमतीत विकत घेण्याची ही चांगली संधी आहे. EV वर तुम्ही किती बचत करु शकता, ते जाणून घ्या.

  • जर तुम्ही इलेक्ट्रिक टाटा पंच खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही चांगली संधी आहे. कंपनीने आपल्या कार वर 50 हजार रुपयांचा डिस्काऊंट ऑफर केलाय. Punch EV ने यावर्षी जानेवारी महिन्यात भारतीय बाजारपेठेत एन्ट्री केली होती. आता या कारवर डिस्काऊंट दिला जातोय.
  • टाटा पंच ईवीची एम्पावर्ड +S LR ACFC वेरिएंट विकत घेण्यावर 50,000 रुपयांचा डिस्काऊंट मिळतोय. हा डिस्काऊंट लोकेशन आणि कारच्या स्टॉकवर अवलंबून आहे. त्यामुळे तुम्हाला डीलरशिपची ऑफर चेक करावी लागेल.
  • 50 हजार रुपयाच्या बचत ऑफरमध्ये 20,000 रुपयांचा डिस्काऊट आणि काही एडिशनल ऑफर दिलीय. इलेक्ट्रिक पंचची किंमत 10.99 लाख रुपयापासून 15.49 लाख रुपयापर्यंत आहे. या सर्व एक्स-शोरूम किंमती आहेत.
  • पंच ईवी तुम्ही दोन बॅटरी ऑप्शन्समध्ये विकत घेऊ शकता. यात एक 25kWh बॅटरी पॅक (82PS/ 114Nm) आहे. याची रेंज 315 किलोमीटर पर्यंत आहे. दुसरी 35kWh बॅटरी पॅक आहे. त्याचाी रेंज 421 किलोमीटर आहे.
  • या बॅटरी पॅकला AC होम चार्जिंगद्वारे 9.4 ते 13.5 तासा फुल चार्ज करता येऊ शकतं. DC फास्ट चार्जिंगद्वारे 56 मिनिटात 10 ते 80 टक्के चार्ज करता येतं. त्या शिवाय 7.2kW एसी होम चार्जरने चार्ज होण्यासाठी 3.6 ते 5 तासांचा वेळ लागतो.