कम्युनिटी डे चे औचित्य साधून एथर एनर्जी तर्फे फॅमिली स्कूटरची सुरुवात

एथर एनर्जी या भारतातील आघाडीच्या इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपनी तर्फे आज त्यांच्या एथर कम्युनिटी डेच्या दुसर्‍या पर्वात रिझ्टा या नवीन फॅमिली स्कूटरची सुरुवात केल्याची घोषणा केली.  संपूर्ण परिवाराच्या उपयोगाकडे लक्ष ठेऊन या स्कूटरचे डिझाईन करण्यात आले असून रिझ्टा ने आरामदायकपणा, सोपेपणा आणि सुरक्षेवर लक्ष्य केंद्रित केले आहे.  यामध्ये अनेक नवीन कनेक्टेड वैशिष्ट्ये असून यामुळे चालकाचा अनुभव अधिक समृध्द होण्यास मदत होते.  यामध्ये स्कीड कंट्रोल आणि व्हॉट्सॲप ऑन दी डॅशबोर्ड सारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.  अतिशय स्पर्धात्मक अशी याची किंमत असून रिझ्टाची  किंमत (एक्स शो रुम बंगळूरु) रु १,०९,९९९/- अशी आहे.

ऑल न्यू रिझ्टा आता २ मॉडेल्स आणि ३ प्रकारात उपलब्ध असून यामध्ये रिझ्टा एस आणि रिझ्टा झेड चा समावेश आहे, याची बांधणी २.९ केडब्ल्यूएच क्षमतेची बॅटरीने युक्त अशी असून रिझ्टा झेडचे टॉप एन्ड मॉडेल हे ३.७ केडब्ल्यूएच ची आहे, यामुळे आयडीसी ची अंदाजे रेंज ही १२३ ‍किमी आणि ३.७ केडब्ल्यूएच ची रेंज १६० किमी ची आहे.  एथर रिझ्टा एस ही ३ मोनोटोन रंगात उपलब्ध असून रिझ्टा झेड ही ७ म्हणजेच ३ मोनोटोन आणि ४ ड्यूअल टोन रंगात उपलब्ध असेल.

एथर एनर्जी चे सहसंस्थापक आणि सीईओ तरुण मेहता यांनी सांगितले “ आम्ही दुचाकीच्या बाजारपेठेत ४५० सिरीज या परफॉर्मन्स स्कूटरच्या माध्यमातून प्रवेश केला.  आता आम्ही रिझ्टाच्या माध्यमातून फॅमिली विभागात प्रवेश करत आहोत, या उत्पादनाचे डिझाईन आणि इंजिनियरींग हे भारतीय परिवाराला समोर ठेऊन करण्यात आले आहे.  हे उत्पादन आराम, सुरक्षा आणि कनेक्टेड टेक हे महत्त्वपूर्ण घटक लक्षात घेऊन करण्यात आले आहेत, कारण हेच घटक परंपरागत स्कूटरची खरेदी करतांना लक्षात घेतले जातात.  रिझ्टा एथरच्या गुणवत्ता, विश्वसनीयता आणि सुरक्षा या घटकांचे प्रतिनिधीत्व करत आहे.”

आरामदायक आणि सोपेपणा

एथर रिझ्टा ने नेहमीच आराम आणि सोपेपणाला प्राधान्य दिले आहे, यामधील वैशिष्ट्ये म्हणजे विभागातील सर्वात मोठी सीट ज्यामुळे वापरकर्त्यांना मोठी जागा  आणि मोठा फ्लोअर बोर्ड मिळतो.  त्याच बरोबर रिझ्टा झेड च्या वैशिष्ट्यांमध्ये बॅकरेस्ट असल्याने मागे बसणार्‍या व्यक्तीच्या कमरेलाही आराम मिळतो.  ५६ लीटरची स्टोअरेज स्पेस, ३४ लीटरची सीट खालील क्षमता आणि पर्यायी २२ लीटर फ्रंक ॲक्सेसरी यामुळे एथरचा असा विश्वास आहे की रिझ्टा स्कूटर बाजारपेठेतील सर्वात मोठी स्टोअरेज स्पेस देते, ज्यायोगे रोजच्या गोष्टी वाहून नेणे सोपे जाते.  अंडरसीट स्टोअरेज मध्ये पर्यायी स्वरुपातील  १८ डब्ल्यू पावर आऊपूटचा मल्टीपर्पज चार्जर असल्यामुळे फोन्स, टॅब्लेट्स, पोर्टेबल स्पिकर्स आणि अशीच अन्य उपकरणे चार्ज करता येतात.

सुरक्षा आणि राईड हँडलिंग

काही वर्षांपासून एथर ने नेहमीच त्यांच्या दुचाकीच्या चालकांच्या सुरक्षा मानकां मध्ये सुधारणा करत अनेक नवीन वैशिष्ट्ये जोडली आहेत.  रिझ्टा मध्ये एथरने प्रथमच स्कीडकंट्रोल सुरु केले आहे.  ही एथरची प्रमुख ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम आहे जी अजोडपणे मोटरच्या टॉर्कवर नियंत्रण आणून ट्रॅक्शन चे नुकसान न होता गाडी ही कमी घर्षण असलेल्या भागावरुन जसे खड्ड्यांसह पॅचेस असलेला रस्ता, वाळू, पाणी किंवा तेल सांडलेल्या अवस्थेत बचाव होतो. (या पध्दतीचा विकास हा एथरच्या इन हाऊस विकसित मोटर कंट्रोल सिस्टम एथर ड्राईव्ह कंट्रोलर (एडीसी) द्वारे करण्यात आला आहे.)

अन्य वैशिष्ट्यांमध्ये फॉल सेफ, इमर्जन्सी स्टॉप सिग्नल(ईएसएस), थेफ्ट ॲन्ड टो डिटेक्ट आणि फाईन्ड माय स्कूटर इत्यादी जी वैशिष्ट्ये एथर ४५० स्कूटर मध्ये होती ती सुध्दा एथर रिझ्टा मध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.

या सर्व प्रकाराची सर्वाधिक गती ही ८० किलोमीटर प्रती तास असून यात  झिप आणि स्मार्ट इको असे दोन मोड्स आहेत. याच बरोबर  मॅजिकट्वीस्ट, ऑटो होल्ड आणि रिव्हर्स मोड सारखी राईड असिस्ट वैशिष्ट्ये ही आहेत, जी ४५० सिरीज मध्येही होती तीच आता रिझ्टा मध्येही उपलब्ध असतील.

रिझ्टा हे उत्पादन ४५० चे तत्व पुढे नेत असून यामध्ये कमी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी,  पुढे आणि मागे बॅलन्स्ड वेट डिस्ट्रिब्युशन आणि दोन्ही बाजूंना समतोल बॅलन्स मुळे चालकाचे कोणतेही कौशल्य असो किंवा कोणत्याही स्थितीत गाडी असो समतोल राखला जातो. ‍रिझ्टा ही वळवण्यास सोपी आहे कारण याचा व्हील बेस हा १२८६ मिमी चा आहे.

हालो- स्मार्ट हेल्मेट

एथर ने आता त्यांच्या उत्पादन श्रेणीत भर घालून स्मार्ट हेल्मेट क्षेत्रातही प्रवेश केला असून एथर हालो हे उत्पादन सुरु केले आहे. एथर हालो ही एक फूल स्पेस, टॉप ऑफ द लाईन एकात्मिक अशी स्मार्ट हेल्मेट आहे.  यामध्ये हर्मन कार्डन द्वारा देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट ऑडिओ अनुभव प्राप्त होतो.  यामध्ये चालकांना अजोड अनुभव  मिळून आकर्षक वेअरडिटेक्ट तंत्रज्ञाना मुळे वायरलेस चार्जिंग सह स्कूटरच्या हँडलबार वरुन ऐकत असलेल्या संगीतासह कॉल्सवरही नियंत्रण मिळू शकते.  हालो मध्ये एथर चिटचॅट वैशिष्ट्य आहे ज्यामुळे ते हेल्मेट टू हेल्मेट संभाषण हे रायडर आणि मागे बसलेल्यांमध्ये सहज करु शकतील.  यामध्ये स्वच्छ आणि भविष्यकालीन डिझाईन असून हे उत्पादन  दोन रंगांच्या पर्यायात उपलब्ध आहे.

एथरने हर्मन कार्डन बरोबर सहकार्य करुन उच्च गुणवत्तेचा ऑडिओ आणि रायडिंग अनुभव देऊ केला आहे.  हालो चे डिझाईन हे वापरकर्त्यांच्या सुरक्षे मध्ये बहुस्तरीय रचनेतून करण्यासह महत्त्वपूर्ण आवाज येण्यास यातून मदत होते, यामुळे अजोड आणि अचूक तसेच सुरक्षित ऐकण्याचा अनुभव प्राप्त होतो.  एथरचा विश्वास आहे की त्यांनी हेल्मेट आणि स्कूटर यांचा चांगला संगम साध्य केला आहे ज्यामध्ये विशेष पध्दतीने तयार करण्यात आलेले वायरलेस चार्जिंग उपाय हे रिझ्टाच्या बूट मध्ये देण्यात आले आहेत.  हालोच्या वेअर डिटेक्ट टेक्नॉलॉजी मुळे हेल्मेट कधी घालायची हे ओळखून हेल्मेटला ३ पध्दतीने फोन, हेल्मेट आणि स्कूटरला पेअर करता येते. एथरचा विश्वास आहे की यामुळे जोडलेली, आरामदायक आणि सुरक्षित राईड हालो मुळे प्राप्त होईल.

या व्यतिरिक्त एथर ने प्रथमच हालो बिट हे मॉड्युलही सुरु केले असून ते एथरच्या हाफ फेस हेल्मेटला जोडता येते.  एथरने हे उपकरण आयएसआय आणि डीओटी रेटेड हाफ फेस हेल्मेट नुसार तयार केले असून ते लवकरच सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध असेल आणि ते हालो बिट बरोबर चालू शकेल.  त्यामुळे आता एथरची प्रत्येक हेल्मेट ही स्मार्ट हेल्मेट बनेल.  हालो ची सुरुवातीची किंमत ही रु १२,९९९ आणि हालो बिट ची किंमत रु ४,९९९/- इतकी असेल.

एथर एनर्जी चे सहसंस्थापक आणि सीटीओ स्वप्निल जैन यांनी सांगितले “ आम्हाला हेल्मेट्स ना एक गरजेच्या गोष्टीवरुन आनंदपूर्ण आणि एंगेजिंग राईड मध्ये बदलायचे होते.  म्हणून आम्ही हालो या हर्मन कार्डन च्या प्रिमियम साऊंड देणार्‍या उत्पादनाची सुरुवात केली आणि आमच्या एकात्मिक अशा ऑटोवेअर डिटेक्ट तंत्रज्ञानासह वायरलेस चार्जिंगशी ते जोडले. हालो मुळे आम्ही हे सुनिश्चित केले की चिटचॅट वैशिष्ट्यामुळे आणि म्युझिक शेअरिंग मुळे मागे बसणार्‍याशी सुध्दा संभाषण करता येईल.”

एथरस्टॅक ६.०

यावेळी एथरने एथरस्टॅक ६.० या त्यांच्या सॉफ्टवेअर स्टॅकच्या नवीन अपडेटची सुरुवात केली.  एथरस्टॅक मुळे एथरच्या सर्व एथर स्कूटर्स चा अनुभव समृध्द होतो.  यामध्ये सॉफ्टवेअर, फर्मवेअर, सिस्टम अल्गॉरिदम्स ची अंतर्गत जोडणी करण्यात आली आहे.  या नवीन अपडेट मध्ये अनेक नवीन वैशिष्ट्ये आणि स्कूटरसाठी अनोखे अनुभव असून यामध्ये नवीन मोबाईल ॲप, एथरच्या डॅशबोर्ड वरील व्हॉट्सॲपचे एकत्रिकरण, लाईव्ह लोकेशन शेअरिंग, पिंग माय स्कूटर, ऑटो रिप्लाय टू कॉल्स आणि ॲलेक्झा एकत्रिकरण यांचा समावेश आहे. सध्याचे एथर वापरकर्ते सुध्दा एथरस्टॅक ६.० या ओव्हर द एअर अपडेटचा लाभ घेऊन यांतील काही वैशिष्ट्यांचाही लाभ घेऊ शकतील.

“आम्ही पहिली स्कूटर सुरु केली तेंव्हापासून एथरस्टॅक हा आमच्या उत्पादनाचा अविभाज्य भाग राहिला असून यामुळे आम्ही सतत आमच्या उत्पादनाचा अनुभव समृध्द करत आलो आहोत. व्हॉट्सॲप ऑन डॅशबोर्ड, लाईव्ह लोकेशन शेअरिंग आणि व्हॉईस कमांड्स सारख्या वैशिष्ट्यांमुळे आमचा असा विश्वास आहे की एथरस्टॅक ६.० आता चालकांची सुरक्षा, सोपेपणा आणि जोडणीसाठी महत्त्वाचे अपडेट आणू शकेल.  टचस्क्रीन डॅशबोर्ड ऑप्टिमाईझ केल्या मुळे आणि मोबाईल ॲप मध्ये सुधारणा केल्यामुळे रिझ्टा आणि एथर ४५० च्या ग्राहकांचा मालकीचा अनुभव समृध्द होऊ शकेल.”  असे एथर एनर्जीचे सहसंस्थापक आणि सीटीओ स्वप्निल जैन यांनी सांगितले.

व्हॉट्सॲप ऑन द डॅशबोर्ड मुळे आता रायडर त्यांचे सर्व मसेजेस डॅशबोर्ड वर स्कूटर थांबलेली असतांना पाहू शकतील, जेणेकरुन ते राईडच्या दरम्यान फोन्सचा त्रास टाळू शकतील.  नवीन ‘पिंग माय स्कूटर’ वैशिष्ट्या मुळे एथरच्या मालकाला आता अनेक दुचाकी उभ्या असतांना सुध्दा शोधता येईल कारण यामध्ये स्कूटर ऑडिओ आणि व्हिज्युअल इशारा करेल, ही सुविधा नवीन एथर ॲपवरील एका बटणाने सुरु करता येऊ शकेल.  एथरस्टॅक ६.० मधील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ॲलेक्झा स्मार्ट असिस्टंट चे एकत्रिकरण करण्यात आले असून यामुळे इंग्रजी आणि ‍हिंदी मधील ५० हून अधिक प्रॉम्प्ट्सचा वापर केला जाऊ शकतो. रायडर्सना आता सध्याचे चार्जिंग, लास्ट पार्क्ड लोकेशन, ट्रिप फिझिबिलिटी, पुश नेव्हिगेशन आणि अशा अनेक गोष्टी आवाजाच्या कमांडने पूर्ण करता येतात.  लाईव्ह लोकेशन शेअरिंग हे आणखी एक सुरक्षा वैशिष्ट्य असून यामध्ये रायडर ला त्याचे लोकेशन गाडी सुरु असतांना प्रीसेट केलेल्या संपर्काला पाठवता येईल.

नवीन मोबाईल ॲप मध्ये पर्सनलाईज्ड आणि सीमलेस अनुभव हा एथरच्या ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. नवीन इंटरफेस सह ॲप मध्ये विडगेटएक्स हे नवीन वैशिष्ट्य आणण्यात आले असून यामुळे वापरकर्त्यांना होम स्क्रीन वर संदर्भानुसार माहिती ठेवता येईल.  ॲप मध्ये आता राईडचा इतिहास, ईव्ही मध्ये गेल्यामुळे झालेली बचत आणि विविध माईलस्टोन्सची माहिती सुध्दा उपलब्ध होईल.

एथरच्या सर्व प्रकारच्या गाड्यांवर एथरची ५ वर्षांची ऑप्शनल वॉरंटी उपलब्ध असून ‘एथर बॅटरी प्रोटेक्ट’ मध्ये बॅटरीची वॉरंटी ही ५ वर्षे/६० हजार किलोमीटर्स पर्यंत वाढवता येईल.  या वॉरंटी प्रोग्राम मुळे केवळ बॅटरी फेल्युअर्सचा धोकाच नव्हे तर ५ वर्षांनी किमान ७० टक्के स्टेट ऑफ हेल्थ असलेल्या बॅटरीची गॅरेंटी सुध्दा कव्हर होईल.

होम चार्जिंग साठी रिझ्टा एस आणि रिझ्टा झेड बरोबर २.९ केडब्ल्यूएच बॅटरी ही ३५० डब्ल्यू एथर पोर्टेबल चार्जर सह तर टॉप एन्ड रिझ्टा झेड  मध्ये ३.७ केडब्ल्यूएच बॅटरी ही ७०० डब्ल्यू नवीन एथर ड्युओ चार्जर सह उपलब्ध होणार आहे.  रिझ्टाच्या मालकांना एथरच्या सर्वसमावेशक अशा फास्ट चार्जिंग नेटवर्क चा लाभ हा त्यांच्या १८०० हून अधिक फास्ट चार्जिंग पॉईंट्सचा लाभ मिळणार आहे.