ग्राहकांना ऑनलाईन आरोग्य विमा ऑफर करण्यासाठी फोनपेची स्टार हेल्थ इन्शुअरन्स बरोबर भागीदारी 

पुणे ३ एप्रिल २०२४: फोनपे तर्फे स्टार हेल्थ आणि अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या भारतातील सर्वात मोठ्या रिटेल आरोग्य विमा कंपनीसह, ग्राहकांना मासिक आणि वार्षिक पेमेंट पर्यायासह आरोग्य विमा ऑफर करण्यासाठी भागीदारी केल्याची घोषणा केली. या भागीदारीमुळे फोनपे युजर आता फोनपे ॲपवर १ कोटी रुपयांपर्यंतच्या कव्हरेजसह ‘स्टार कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स पॉलिसी’चा लाभ घेऊ शकतील या भागीदारीद्वारे पहिल्यांदाच स्टार हेल्थ इन्शुरन्सचा सर्वसमावेशक आरोग्य विमा ग्राहकांना मासिक प्रीमियम पेमेंट प्लॅनसह ऑफर केला जाईल, या विम्याला फोनपे ने पहिल्यांदा सुरुवात केली असून, या उद्योगक्षेत्रातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे. युजर युपीआय ऑटो-पे मँडेटसह प्रीमियम भरण्याचा पर्यायही निवडू शकतात आणि अतिरिक्त सुविधेचा आनंद घेऊ शकतात. लहान प्रमाणात मासिक पेमेंट करणाऱ्या युजरवरील आर्थिक ताण वाढू नये, त्यांचा आर्थिक ताण न वाढताही अधिक विस्तारित विमा कवच त्यांना मिळावे यासाठी त्यांना सबळ आणि सक्षम करणे हा या कृतीमागचा महत्त्वाचा हेतू आहे. 

स्टार कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स पॉलिसी ही एक पॉवर पॅक विमा योजना आहे ज्यामध्ये सर्वात लोकप्रिय ओपीडी आणि प्रसूती कव्हरेजचा समावेश आहे.  स्टार कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ही एंड-टू-एंड हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आहे, ज्यामध्ये रु. १ कोटी पर्यंत विम्याची रक्कम उपलब्ध आहे. ही पॉलिसी रोड ॲम्ब्युलन्स आणि एअर ॲम्ब्युलन्सचा खर्च, मर्यादेपर्यंत बाह्यरुग्ण वैद्यकीय सल्लामसलत, दंत आणि नेत्ररोग उपचारांसाठी बाह्यरुग्ण कवच, प्रसूती खर्च, अवयव दात्याचा खर्च, तसेच बाळ एक वर्षाचे होईपर्यंत जन्म आणि लसीकरणाचा खर्च, नवजात बालकांना, कोणत्याही जन्मजात विकारांसह संरक्षण देते. मानसिक आरोग्य विमा त्याच्या रकमेपर्यंत कव्हर केला जातो. पॉलिसी डे केअर प्रक्रियेसाठी उपमर्यादा लादत नाही. तसेच अपघाती मृत्यू आणि कायमस्वरूपी अपंगत्व १ कोटीपर्यंत कवच दिले जाते. 

या भागीदारीबद्दल बोलताना फोनपे इन्शुरन्सचे  मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल गुप्ता म्हणाले, “फोनपे स्टार हेल्थ सोबतच्या या भागीदारीबद्दल उत्सुक आहे. फोनपे चे वितरण, ग्राहक केंद्रित दृष्टीकोन आणि साधे डीआयवाय  हे देशातील टर्बोचार्ज विम्याचा अंगिकार आणि प्रवेश यासाठी मदत करतील. भारतामध्ये कमी विमा उतरवले जातात इथपासून भारत हे पुरेसा विमाधारक राष्ट्र बनेल या मिशनसाठी आम्ही कार्यरत आहोत आणि या प्रवासात स्टारसोबतची भागीदारी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.”

या भागीदारीबद्दल बोलताना, स्टार हेल्थ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक  आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रॉय म्हणाले,  “आम्ही फोनपे सह भागीदारी करण्यास आणि जेन झी आणि मिलेनिअल्सवर लक्ष्य केंद्रित करून आरोग्य विमा ऑफर करण्यास उत्सुक आहोत. स्टारमध्ये आम्ही आमच्या ग्राहकांना निरोगी ठेवण्यावर विश्वास ठेवतो आणि त्या दृष्टीने आमच्या पॉलिसी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना फक्त विमाच नाही, तर इतर सेवांसह त्यांना मोफत टेलिसोल्युशन्स, घरगुती काळजी आणि पोषणतज्ज्ञांचाही ॲक्सेस देतो. आम्ही या भागीदारीद्वारे आमची डिजिटल पोहोच वाढवण्यास उत्सुक आहोत.”

युजर फोनपे ॲपद्वारे आरोग्य विमा पर्यायावर क्लिक करून विमा काढण्यासाठी सदस्य निवडून, विमा काढण्याची इच्छित रक्कम आणि पेमेंट कालावधी निवडून पॉलिसी खरेदी करू शकतात. येथे ते मासिक ईएमआय किंवा वार्षिक पेमेंट निवडू शकतात आणि नंतर त्यांच्या आवडीची पॉलिसी निवडू शकतात. एकदा पॉलिसी निवडली की, ग्राहकांना नाव, वय आणि लिंग, त्यानंतर विमा उतरवलेल्या सर्व सदस्यांचा आरोग्य इतिहास यासारखे त्यांचे तपशील भरावे लागतील. एकदा का पेमेंट पूर्ण झाले, की फॉर्म आणि घोषणांद्वारे नियामक अनिवार्य केले जाईल.