वैशाली त्रिभुवन-नवले यांचे निधन

पुणे : राज्याच्या महिला व बालविकास विभागातील वरिष्ठ अधिकारी वैशाली त्रिभुवन-नवले (वय ५६) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे डॉक्टर मुलगी व मुलगा असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्त्या मिनाक्षी नवले यांच्या त्या लहान बहीण होत्या. मुंढव्यातील मुलींच्या शासकीय विशेष गृहात त्या अधिक्षिका होत्या. लैंगिक शोषण झालेल्या मुलींच्या पुनर्वसनासाठी काम करत. जळगाव सेक्स रॅकेटमध्ये तत्कालीन पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्यासोबत त्यांनी विशेष कामगिरी बजावली होती. महिला व बालविकास विभागामध्ये कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती.