एस. सी. मास. इन्स्टिट्यूटच्या आयुष सुर्वेची गरुडझेप

एस. सी. मास. इन्स्टिट्यूटच्या संचलिक सुजाता हलवाई यांच्याकडे शिक्षण घेणाऱ्या आयुष सुर्वेची “नोबेल वर्ल्ड रेकॉर्ड “ मध्ये नोंद झाली आहे. आयुष सुर्वे हा ब्लोसम पब्लिक स्कूल, न्यू नऱ्हे  येथील विद्यार्थी असून त्याला शालेय अभ्यासक्रमात ५ वी पर्यंत वर्गमूळ नसतानाही त्याने ५० वर्गमूळे १ मिनिटात सोडविल्याचे रेकॉर्ड बनविले आहे. सुजाता हलवाई यांच्या इन्स्टिट्यूट मधून आतापर्यंत १ लाख विद्यार्थ्यानी गणिताचे प्रशिक्षण घेतले असून २००५ पासून त्या कार्यरत आहेत.

शिक्षण घेत असताना मुलांच्या मनातील गणिताची भीती जाऊन गणित सोपे व्हावे या उद्देशाने त्या कार्यरत आहेत. त्यांनी अनेक गरीब मुलांनाही याचे प्रशिक्षण दिले आहे.   त्यांच्या या कार्याचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे. ब्लोसम पब्लिक स्कूलच्या  मुख्याध्यापिका वंदना खरात, जे. पी. एम. चे ट्रस्टी ऋषिराज सावंत, त्याचे पालक सचिन सुर्वे एस. सी. मास. इन्स्टिट्यूटच्या संचालिका सुजाता हलवाई यांनी त्याच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.