‘जय श्री राम’ सोडून ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देण्याची जबरदस्ती व मारहाण

पीडित मुलाच्या तक्रारीवरुन मीरा रोड पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात IPC सेक्शन 448, 295A, 153A 37,(1)C आणि महाराष्ट्र पोलीस एक्टच्या कलम135 अतंर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत. आरोपींची संख्या पाच असल्याच सांगितलं जातय.

मुंबईला लागून असलेल्या मीरा रोडमध्ये पुन्हा एकदा धार्मिक कट्टरतेच प्रकरण समोर आलय. एक अल्पवयीन मुलगा जय श्री राम बोलला म्हणून दुसऱ्या समाजाच्या युवकांनी त्याला बेदम मारहाण केली. पीडित मुलाला ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा द्यायला देखील भाग पाडण्यात आलं. पीडित मुलाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवलाय. आरोपी पीडित मुलाचा पाठलाग करत असल्याच सीसीटीव्ही फुटेज समोर आलय. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. 25 मार्च रात्री 9 वाजताची घटना आहे. या प्रकारानंतर पीडित मुलगा खूप घाबरला आहे. तो दूध घेण्यासाठी बाहेर आला होता, त्यावेळी ही घटना घडली.

मीरा रोड भागात या पूर्वी सुद्धा जातीय वाद झाला आहे. राम मंदिर प्राण प्रतिष्ठेआधी 21 जानेवारीला दोन गटांमध्ये हिंसक झडप झाली होती. परिसरातील धार्मिक तणाव लक्षात घेऊन पोलीस प्रशासन पूर्णपणे अलर्ट आहे.

पीडित मुलाला लिफ्ट जवळ पकडलं

सोमवारी रात्री अल्पवयीन मुलाग दूध घेऊन सोसायटीच्या दिशेने येत होता. सोसायटी जवळ उभ्या असलेल्या एका माणसाला तो जय श्री राम बोलला. आरोप आहे की, त्या व्यक्तीच्या बाजूला असलेल्या अन्य पाच जणांनी त्याला थांबायला सांगितलं. पीडित मुलगा त्यांना बघून घाबरला. तो सोसायटीच्या आत पळाला. आरोपी सुद्धा त्याच्या मागे पळाले. आरोपींनी पीडित मुलाला लिफ्ट जवळ पकडलं व त्याला मारहाण केली.

मुलाने कोणाला पाहून जय श्री राम म्हटलं?

पीडित मुलाचा आरोप आहे की, त्याला माराहण केल्यानंतर आरोपी युवकांनी त्याला अल्लाहू अकबरच्या घोषणा द्यायला लावल्या. पीडित युवकाने भितीपोटी घोषणा दिल्या. तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने या घटनेची मुलाच्या वडिलांना माहिती दिली. पीडित मुलाचे वडिल तिथे येताच आरोपी पळून गेले. पीडित मुलाने सांगितलं की, “तो जेव्हा सोसायटीच्या दिशेने आला, त्यावेळी त्याला वाटलं की, वॉचमन उभा आहे. म्हणून त्याने त्या व्यक्तीला जय श्री राम म्हटलं”