बोरघाट उतरताना टँकरचा भीषण अपघात

पुण्याहून मुंबईकडे दूध टँकर जात होते. यावेळी खोपोली हद्दीत बोर घाट उतरताना टँकर चालकाने लेन बदली. यामुळे टँकर अचानक कलंडले. त्याचवेळी हे टँकर कारवर समोरील बाजूला आदळले. त्यानंतर समोर जाणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली.

मुंबई, पुणे एक्स्प्रेस वे वरुन रोज हजारो वाहने जात असतात. शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी होत असते. आता रविवारी या महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात दूधाचे टँकर होते. त्यामुळे टँकरमधील दूध रस्त्यावर पसरले. अपघातात दुधाच्या टँकरचा चालक ठार झाला. परंतु दैव बलवत्तर होते म्हणून कारमधील दोघे प्रवासी बचावले.

पुण्याहून मुंबईकडे दूध टँकर जात होते. यावेळी खोपोली हद्दीत बोर घाट उतरताना टँकर चालकाने लेन बदली. यामुळे टँकर अचानक कलंडले. त्याचवेळी हे टँकर कारवर समोरील बाजूला आदळले. त्यानंतर समोर जाणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. यामुळे रस्त्यावर सर्व दूध सांडले. यामुळे सुटीच्या दिवशी वाहतूक कोंडी निर्माण होणाऱ्या या मार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी निर्माण झाली. अपघातामुळे बराच वेळ वाहतूक बंद होती. अपघातात दूध टँकरचा चालक ठार तर कारमधील दोघे प्रवासी बचावले.