सरकारी अधिकारी आणि त्यांचा भोंगळ कारभार हा आपल्यासाठी काही नवीन नाही दिवसेंदिवस अशा अनेक घटना घडताना पाहायला मिळत आहे. छत्तीसगडमध्ये अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे. ही घटना जाणून तुम्ही थक्क व्हाल. एका सरकारी अधिकाऱ्याने धरणामध्ये स्वतः चा पडलेला मोबाईल शोधण्यासाठी धरणातील 21 लाख लिटर पाणी बाहेर उपसले आहे यामुळे 21 लाख लिटर पाणी वाया गेलेले आहे.
ही घटना छत्तीसगडमधील कांकेर या ठिकाणी घडलेली आहे. निलंबित झालेल्या सरकारी अधिकाऱ्यांचे नाव अन्न निरीक्षक राजेश विश्वास आहे. या अधिकाऱ्याने केलेली करामत पाहून बडे बडे लोक थक्क झालेले आहेत. या अधिकाऱ्याच्या अकलेचे कौतुक देखील सर्व स्तरातून केले जात आहे. उपसल्या गेलेल्या पाण्यामुळे दीड हजार एकर जमिनीला पाणी मिळू शकते, इतके पाणी या अधिकाऱ्याच्या आदेशामुळे बाहेर फेकले गेले.
छत्तीसगडमधील कांकेर भागातील जलाशयात या अधिकाऱ्याचा मोबाईल पडला. मोबाईल पडल्यावर काही लोक पाण्यामध्ये देखील उतरले परंतु मोबाईल न सापडल्यामुळे शेवटी तीन दिवस डिझेल पंप च्या मदतीने जलाशयातील पाणी बाहेर उपसण्याचे कार्य सुरू करण्यात आले. ही घटना कळताच छत्तीसगडचे जिल्हाधिकारी प्रियंका शुक्ला यांनी या अधिकाऱ्यांचे निलंबन केले. उन्हाळ्याच्या दिवसात 21 लाख लिटर पाण्याची नासाडी केल्याने तसेच पदाचा गैरवापर केल्यामुळे निलंबित झालेला अधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे कलम देखील लावण्यात आले आहेत.