पुणे (प्रतिनिधी) : भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांचा आज, शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी पुणे परिसरात विविध ठिकाणी दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यात त्या विविध ठिकाणी भेट देणार असून, देवीच्या आरतीच्या कार्यक्रमांनाही उपस्थित राहणार आहेत.
दौऱ्याच्या नियोजनानुसार, सायंकाळी ५ वाजता डोणजे येथील नाना पाटेकर यांच्या फार्महाऊसवर त्या भेट देणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता नांदेड फाटा येथील वृद्धाश्रमाला भेट देतील.
सायंकाळी ७.३० वाजता उत्तमनगर येथे देवीच्या आरतीला, तर रात्री ८ वाजता शिवणे येथील देवीच्या आरतीच्या कार्यक्रमात त्या सहभागी होणार आहेत.
सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या तृप्ती देसाई यांच्या या दौऱ्याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.





