सम्यक विहार विकास केंद्र, बोपोडी येथे रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन साजरा!

By: Editor_Manas

On: Sunday, October 4, 2026 3:04 PM

Google News
Follow Us

पुणे : सम्यक विहार विकास केंद्र, बोपोडी येथे रिपब्लिकन पक्षाचा ६९ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी उपमहापौर परशुराम वाडेकर,  माजी  उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर यांच्या उपस्थितीत पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते  ज्वेल अँथोनी व =गलेलू यांच्या हस्ते अशोकचक्रांकित निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस  महेंद्र निकाळजे व शेख साहेब यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपस्थितांना रिपब्लिकन पक्षाच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास महिला पदाधिकारी, प्रमुख पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्ते व पक्षाचे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजीनगर मतदारसंघाचे अध्यक्ष अविनाश कदम यांनी केले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now