सोनिकवॉलच्या पुण्यातील नवीन कार्यालयाचे उदघाटन

By: Editor_Manas

On: Thursday, October 22, 2026 5:54 PM

Google News
Follow Us
पुणे/बेंगळुरू, २२ ऑक्टोबर २०२६: जागतिक स्तरावर कार्यरत सायबर सिक्युरिटी कंपनी असलेल्या सोनिकवॉलने आज पुण्यात आपल्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन केले. कंपनीच्या भारतातील दीर्घकालीन गुंतवणूक आणि विस्ताराच्या धोरणाला यामुळे आणखी बळ मिळणार आहे.या नवीन सुविधेमुळे कंपनीच्या अभियांत्रिकी आणि विकास कामकाजाला अधिक सक्षम करण्याबरोबरच भारतातील टेक्निकल टॅलेंट पर्यंत कंपनीची पोहोच वाढणार असून,कंपनीच्या जगभरातील ग्राहकांसाठी प्रॉडक्ट इनोव्हेशनला चालना मिळणार आहे.

भारताकडे असलेली प्रतिभा, वेगाने विस्तारत असलेली डिजिटल अर्थव्यवस्था आणि सातत्याने बदलणाऱ्या सायबर सिक्युरिटी गरजा यामुळे सोनिकवॉलच्या संशोधन,अभियांत्रिकी आणि भविष्यकेंद्रीत तंत्रज्ञानासाठी भारत हे महत्त्वाचे केंद्र बनले आहे.

बेंगळुरूमधील आधीपासून भक्कमपणे कार्यरत असलेल्या आरअँडडी सेंटरला पुण्यातील नवीन कार्यालय हे पूरक ठरणार आहे. स्थानिक कौशल्य आणि ॲडव्हान्स्ड सायबर सिक्युरिटी सोल्युशन्स विकसित करणाऱ्या टीम्स यांना जोडत सोनिकवॉलच्या ग्लोबल प्रॉडक्ट रोडमॅपला अधिक वेग देण्यास यामुळे मदत होईल.

सोनिकवॉलचे मुख्य विकास अधिकारी रजनीश मिश्रा म्हणाले, “सोनिकवॉलच्या विकास आणि अभिनवता धोरणामध्ये भारताचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. पुण्यातील आमचे कार्यालय जागतिक दर्जाचे कौशल्य विकसित करण्यास, आमची विकास क्षमता वाढविण्यास आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करणारी सायबर सिक्युरिटी सोल्युशन्स विकसित करण्यास सक्षम करेल. भारतात दीर्घकालीन उपस्थिती निर्माण करण्यासोबतच देशाच्या तंत्रज्ञान परिसंस्थेमध्ये योगदान देण्यास आम्ही उत्सुक आहोत.”

सोनिकवॉलमधील एपीजे क्षेत्रातील विक्री विभागाचे उपाध्यक्ष देबाशीष मुखर्जी म्हणाले, “एआय, क्लाउड टेक्नॉलॉजीज, सायबर सिक्युरिटी रिसर्च आणि नेक्स्ट-जेनरेशन प्लॅटफॉर्म डेव्हलपमेंट या क्षेत्रांमध्ये भारतात ४०० अभियांत्रिकी रोजगार निर्माण करण्याच्या दिशेने सोनिकवॉल पुढे जात आहे. यामुळे कंपनीचे जगातील सर्वात मोठे ग्लोबल डेव्हलपमेंट सेंटर्सपैकी एक उभारले जाईल आणि जागतिक उत्पादन धोरणामध्ये भारताचे योगदान अधिक महत्त्वपूर्ण ठरेल.”

आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लाउड ॲडॉप्शन आणि अधिकाधिक विकेंद्रित होत असलेल्या डिजिटल परिसंस्थेमुळे निर्माण होणाऱ्या सायबर सिक्युरिटी आव्हानांवर विस्तारित टीम लक्ष केंद्रित करेल.

विशेष कौशल्य विकसित करण्यासाठी तसेच सातत्यपूर्ण कौशल्य प्रशिक्षण आणि सहयोगाला चालना देण्यासाठी सोनिकवॉल प्रयत्नशील राहणार आहे. भारतातून निर्माण होणाऱ्या कल्पनांचे जागतिक बाजारपेठेसाठी उत्पादन आणि क्षमतांमध्ये रूपांतर करण्यावरही कंपनीचा भर असेल.

सोनिकवॉलचे भारतातील कार्यकारी उपाध्यक्ष आणि सरव्यवस्थापक अनुराग काहोल म्हणाले, “लघु व मध्यम उद्योग हे सोनिकवॉलच्या कस्टमर बेसमधील महत्त्वाचे घटक आहेत. पुण्याची वेगाने विकसित होणारी तंत्रज्ञान आणि औद्योगिक परिसंस्था पाहता, हे क्षेत्र आमच्यासाठी विशेष महत्त्वाचे आहे. स्थानिक व्यवसाय अधिकाधिक कनेक्टेड होत असताना त्यांची सुरक्षितपणे व्यवसाय वृद्धी साधण्यासाठी त्यांना मदत करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.”

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now