अरुंधती फाउंडेशनतर्फे सामूहिक तर्पण कार्यक्रमाचे १० ऑक्टोबरला आयोजन

By: Editor_Manas

On: Thursday, October 8, 2026 4:19 PM

Google News
Follow Us

पुणे : सर्वपित्री अमावस्येनिमित्त आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना तसेच धर्मरक्षणासाठी प्राणार्पण करणाऱ्या वीरांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यासाठी अरुंधती फाउंडेशन, पुणे आणि श्री देवदेवेश्वर संस्थान, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक तर्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती अरुंधती फाउंडेशनचे अध्यक्ष हिमांशु गुप्ते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी संस्थेचे आदित्य गुप्ते उपस्थित होते.

शनिवार, १० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सदाशिव पेठेतील एस. पी. कॉलेज कॅम्पस येथील लेडी रमाबाई हॉल येथे हा कार्यक्रम होणार आहे. सर्वपित्री अमावस्येच्या पवित्र दिवशी पूर्वजांच्या स्मृतींना अभिवादन करण्याबरोबरच देश, धर्म आणि मातृभूमीसाठी बलिदान देणाऱ्या असंख्य वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सदानंद गोविंद फडके राहणार असून प्रमुख निमंत्रित म्हणून स्वाती  गोयल शर्मा उपस्थित राहणार आहेत. यावेळी ‘जेम्स ऑफ बॉलिवूड’ या विषयावर स्वाती गोयल शर्मा यांचे विशेष ऑडिओ-व्हिज्युअल सादरीकरणही होणार आहे.

रमेश भागवत, विश्वस्त, श्री देवदेवेश्वर संस्थान, पुणे हे सहकार्य करणार आहेत. अरुंधती फाउंडेशनचे आयोजक हिमांशू गुप्ते आणि आदित्य गुप्ते यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाला कर्णाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे, अरुंधती फाउंडेशन आणि कै. श्रीकांत लिंगायत मेमोरियल ट्रस्ट, पुणे यांचे सहकार्य लाभले आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now