पुणे : समाजसेवेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या देशसेवा फाऊंडेशनच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा मोठ्या उत्साहात करण्यात आली. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पदाची तसेच संस्थेच्या कामकाजातील गोपनीयतेची शपथ देण्यात आली. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. नरेंद्र पारखे आणि सचिव श्री. अमोल हांडे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
देशसेवा फाऊंडेशनच्या कार्यकारिणीत नरेंद्र पारखे (संस्थापक अध्यक्ष), शारदा शेळके, (उप अध्यक्षा), अमोल हांडे (सचिव), संजय कैकाडे (खजिनदार), पूर्वा हांडे (सभासद व पुणे जिल्हा महिला अध्यक्ष), हर्षा कैकाडे (सभासद व पुणे शहर महिला उपाध्यक्ष), ओंकार पारखे (सभासद व पर्वती मतदार संघ अध्यक्ष), राजेश माने (पुणे शहर अध्यक्ष), सुरेखा मते (पुणे शहर महिला अध्यक्षा), अस्मिता पारखे (महिला समन्वयक), भारत शाह (महाराष्ट्र समन्वयक), प्रतिक गंगणे (खडकवासला विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष), नीलम कुलकर्णी (शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ अध्यक्षा), वंदना कोर्टीकर (कोथरूड विधानसभा मतदार संघ अध्यक्षा) मंजुषा आवळकंठे (पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ अध्यक्षा), ज्ञानेश्वर शिंदे (वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष), संगीता शिंदे (मावळ विधानसभा मतदारसंघ अध्यक्षा आणि शिवानी आवळकंठे (प्रसिद्धी माध्यम प्रमुख) महाराष्ट्र राज्य यांची नियुक्ती करण्यात आली.
या सर्व नियुक्त्या सर्वानुमते करण्यात आल्याचे संस्थापक अध्यक्ष श्री. नरेंद्र पारखे यांनी जाहीर केले. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी फाऊंडेशनच्या ध्येयधोरणांनुसार समाजहितासाठी प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. आगामी काळात देशसेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक, महिला सक्षमीकरण, युवक, गरजू नागरिक तसेच विविध जनहिताच्या विषयांवर व्यापक उपक्रम राबविण्यात येणार असून, पुण्यासह महाराष्ट्रातील विविध भागांत फाऊंडेशनचे सामाजिक कार्य अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष श्री. नरेंद्र पारखे म्हणाले, पद ही प्रतिष्ठा नसून समाजसेवेची जबाबदारी, “देशसेवा फाऊंडेशनमध्ये मिळालेले प्रत्येक पद हे प्रतिष्ठेचे नव्हे, तर समाजसेवेची मोठी जबाबदारी आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत आणि न्याय पोहोचविणे, गरजूंच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणे आणि समाजहिताचे उपक्रम प्रभावीपणे राबविणे हे फाऊंडेशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे. नवनियुक्त प्रत्येक पदाधिकारी हा फाऊंडेशनचा चेहरा आणि समाजाशी जोडणारा दुवा आहे. त्यामुळे प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि सेवाभाव या तीन मूल्यांच्या आधारावर सर्वांनी काम करावे.”
“फाऊंडेशनचे सचिव श्री. अमोल हांडे म्हणाले, एकजुटीने काम केल्यास समाजपरिवर्तन शक्य” “देशसेवा फाऊंडेशनची ताकद ही त्याच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीत आहे. आजची कार्यकारिणी ही समाजातील विविध घटकांना एकत्र घेऊन काम करण्याच्या व्यापक दृष्टिकोनातून तयार करण्यात आली आहे. प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या जबाबदारीकडे केवळ पद म्हणून न पाहता समाजाप्रती असलेले कर्तव्य म्हणून पाहावे. संघटित प्रयत्न, योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण जनसेवा यांच्या माध्यमातून फाऊंडेशनच्या कार्याचा विस्तार महाराष्ट्रभर करण्याचा आमचा संकल्प आहे.”




