पुणे, सप्टेंबर २०२६: ‘लोटस कार्स इंडिया’ने देशभरात ग्राहक आणि संभाव्य ग्राहकांसाठी एका विशेष ‘ब्रँड अनुभव’ उपक्रमाची घोषणा केली आहे. या उपक्रमाद्वारे त्यांची पुरस्कारविजेती इलेक्ट्रिक परफॉर्मन्स कार ‘लोटस इलेट्रे’ भारतातील प्रमुख लक्झरी वाहन बाजारपेठांमधील ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाणार असून, या दौऱ्याच्या पश्चिम भारतातील टप्प्यामध्ये पुणे हे एक महत्त्वाचे ठिकाण असणार आहे.
विविध शहरांच्या या दौऱ्याचा एक भाग म्हणून लोटस कार्स इंडिया संभाव्य ग्राहक, उद्योजक, व्यावसायिक नेते, आलिशान जीवनशैलीचे ग्राहक आणि वाहनप्रेमींसाठी २१ ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुण्यात एका विशेष ब्रँड अनुभवाचे आयोजन करत आहे. पुणे ॲक्टिव्हेशनची रचना ग्राहक आणि ब्रँड अनुभव म्हणून करण्यात आली आहे. त्यामध्ये निवडक निमंत्रितांना विशेष ड्राईव्ह अनुभव, व्यक्तिगत उत्पादन प्रात्यक्षिके आणि ब्रँडची सविस्तर माहिती दिली जाईल.
लोटस इलेट्रे ही ब्रँडची संपूर्ण इलेक्ट्रिक हायपर-एसयूव्ही आहे. यामध्ये जबरदस्त कामगिरी, प्रगत तंत्रज्ञान आणि दैनंदिन उपयुक्तता यांचा संगम साधण्यात आला आहे. ही गाडी लोटससाठी एका नव्या पर्वाचे प्रतिनिधित्व करणारी असून ती या ब्रँडच्या समानार्थी असलेली कामगिरी करून दाखविते. त्याचसोबत एका लक्झरी एसयूव्हीकडून अपेक्षित असलेली बहुविध उपयोगिताही देते.
लोटस कार्स इंडियाच्या संचालिका एमी अरोरा म्हणाल्या, “आमच्या जाणकार ग्राहकांसाठी सर्वोत्तम दर्जाचे ब्रँड्स आणि अनुभव घेऊन येणे हा आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. उत्कृष्टतेला नवे अर्थ देणारे आणि संपूर्ण उद्योगासाठी उच्च मानकांना प्रेरणा देणारे मापदंड स्थापित करण्यावर आमचा विश्वास आहे. अढळ निर्धार आणि ‘ग्राहक प्रथम’ हे तत्त्वज्ञान यांमुळे आम्ही इतरांपेक्षा वेगळे ठरतो, त्यामुळे प्रगतीची पातळी सतत उंचावण्याची आणि आमच्या ग्राहकांशी दीर्घकाळ टिकणारे नातेसंबंध निर्माण करण्याची आम्हाला प्रेरणा मिळते. त्याच वेळी, सर्वसमावेशक विक्री आणि विक्रीपश्चात सेवेच्या आधारावर संपूर्ण भारतात मालकीचा एक सुरळीत अनुभव देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
केवळ वाहनांचे प्रदर्शन करण्यापलीकडे पुण्यातील हा उपक्रम म्हणजे देशभरात आपली उपस्थिती वाढवण्याच्या आणि प्रमुख लक्झरी बाजारपेठांमधील ग्राहकांशी असलेले संबंध अधिक दृढ करण्याच्या लोटस कार्स इंडियाच्या कटिबद्धतेचे प्रतीक आहे. लोटसने अशाच प्रकारचे रोडशो अनेक शहरांमध्ये आयोजित केले असून त्यांना ग्राहक आणि वाहनप्रेमींकडून सातत्याने उत्साही प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात अधिक सखोल संबंध प्रस्थापित करण्यावर ब्रँडचे लक्ष केंद्रित असल्याचे अधोरेखित होते.





