पुणे, सप्टेंबर २०२६: अॅक्सिस मॅक्स लाईफ इन्शुरन्स लिमिटेड ने आज कांतारच्या भागीदारीत आयोजित केलेल्या आपल्या वार्षिक ‘भरोसा टॉक्स इंडिया रिटायरमेंट इंडेक्स स्टडी’ (आयरिस ६.०) च्या सहाव्या आवृत्तीचे निष्कर्ष जाहीर केले. या अभ्यासात शहरी भारतात निवृत्तीची कल्पना कशी केली जात आहे यात एक मूलभूत बदल दिसून येतो: भारतीय लोक अधिकाधिक लवकर निवृत्त होऊ इच्छितात आणि लवकर निवृत्तीचा विचार करू लागले आहेत, परंतु इच्छेपासून तयारीपर्यंतचा आर्थिक प्रवास अजूनही दीर्घ आहे.
भारताची एकूण निवृत्तीची तयारी यावर्षीही मजबूत राहिली आहे. २०२६ मध्ये भरोसा टॉक्स आयरिस ६.० स्कोअर ४९ होता आणि तो २०२५ मध्ये ४८ आणि २०२२ मध्ये ४४ होता. आर्थिक तयारीचा स्कोअर ५१ वरून किंचित सुधारून ५२ झाला, आरोग्य तयारीचा स्कोअर ४६ वर कायम राहिला, तर भावनिक तयारीचा स्कोअर गेल्या वर्षीच्या ५८ च्या तुलनेत ५७ होता.
भरोसा टॉक्स आयरिस ६.० मध्ये असे आढळून आले आहे की, लोकांच्या आर्थिक गरजा पूर्णपणे भागवल्या गेल्या, तर १० पैकी ७ शहरी भारतीयांना ५८-६० या पारंपरिक सेवानिवृत्तीच्या वयाआधीच निवृत्त व्हायला आवडेल. निवृत्त होण्याची इच्छा असलेल्यांपैकी निम्मे लोक वयाच्या ५० वर्षांपूर्वी आर्थिक स्वातंत्र्य मिळवून लवकर निवृत्त (फायर) होण्याचे ध्येय ठेवतात. तथापि, प्रतिसादकर्त्यांनी त्यांच्या लक्ष्यित सेवानिवृत्ती निधीपैकी सरासरी केवळ २८ टक्के निधी जमा केला आहे. त्यातून सेवानिवृत्तीची महत्त्वाकांक्षा आणि सेवानिवृत्तीसाठीची आर्थिक तयारी यांमधील अंतर दिसते.
महिला निवृत्तीबाबत संतुलित दृष्टिकोन दर्शवतात.
महिलांनी भरोसा टॉक्स आयरिस ६.० मध्ये ४९ टक्केवारी नोंदवली आहे. ती पुरुषांच्या बरोबरीची आहे. याला तुलनात्मक आर्थिक, भावनिक आणि आरोग्य सज्जतेचा आधार आहे. ६२ टक्के महिलांना निवृत्तीसाठी आवश्यक असलेल्या निधीची माहिती आहे, ५२ टक्के महिलांनी आरोग्य विमा असल्याचा दावा केला आहे आणि ४१ टक्के महिला सक्रियपणे शारीरिक हालचालींमध्ये सहभागी होतात. शिवाय, ३० टक्के महिलांचा विश्वास आहे की त्यांचा निवृत्ती निधी १० वर्षांपेक्षा जास्त काळ पुरेल.
अॅक्सिस मॅक्स लाईफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुमित मदन म्हणाले, खऱ्या अर्थाने निवृत्तीची तयारी ही व्यक्तींना गरजेपोटी नव्हे, तर त्यांना काम करण्याची इच्छा आहे म्हणून काम करण्यास सक्षम करणारी असावी. दिलासादायक बाब म्हणजे भारतीय तरुण आपला निवृत्तीचा प्रवास खूप लवकर सुरू करत आहेत. त्यातून प्रतिक्रियात्मक नियोजनाकडून सक्रिय तयारीकडे होणाऱ्या स्वागतार्ह बदलाचे संकेत मिळतात. पुढील कार्य म्हणजे या हेतूचे आर्थिक, आरोग्य आणि भावनिक कल्याणाच्या बाबतीत शाश्वत कृतीत रूपांतर करणे, कारण सुरक्षित निवृत्ती म्हणजे अंतिमतः स्वातंत्र्य, निवडीचे स्वातंत्र्य आणि मनःशांती होय.”





