महिलांसाठीच्या या नवीन क्रेडिट कार्डमध्ये खर्चावर मिळणारे रिवॉर्ड्स, आरोग्य तपासणी आणि जीवनशैलीशी संबंधित फायदे यांचा मेळ साधण्यात आला आहे
मुंबई, 19 ऑगस्ट 2026: भारतातील खासगी क्षेत्रातील आघाडीच्या बँकांपैकी एक असलेल्या येस बँकेने येस इसेन्स क्रेडिट कार्ड सादर करण्याची घोषणा आज केली. आजच्या काळातील महिलांसाठी हे कार्ड विचारपूर्वक तयार करण्यात आले आहे. तरुण व्यावसायिक, नोकरदार आणि डिजिटल तंत्रज्ञानाची जाण असलेल्या महिलांच्या गरजा लक्षात घेऊन हे कार्ड डिझाइन केले गेले आहे. भारताच्या कन्झमशन आणि पत-व्यवहारांच्या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महिलांच्या बदलत्या आकांक्षा आणि जीवनशैलीविषयक आवडी हे कार्ड पूर्ण करेल.
या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी येस बँकेचे क्रेडिट कार्ड्स आणि मर्चंट ॲक्वायरिंग विभागाचे कंट्री हेड श्री. अनिल सिंग म्हणाले, “ग्राहकांच्या बदलत्या आकांक्षा समजून घेण्यापासूनच नावीन्यपूर्ण उपक्रमांची खऱ्या अर्थाने सुरुवात होते, यावर आमचा विश्वास आहे. आर्थिक विकास आणि संपत्ती निर्मितीमध्ये महिलांचा सहभाग वाढत असल्याने, खास त्यांच्यासाठी तयार केलेल्या आर्थिक सेवा-सुविधांची मागणीही वाढती आहे. आजच्या आर्थिकदृष्ट्या सक्षम महिलांची जीवनशैली आणि गरजा लक्षात घेऊन, त्यांना उपयुक्त व फायदेशीर ठरेल असा वेगळा अनुभव देण्याच्या उद्देशानेच आम्ही येस इसेन्स हे क्रेडिट कार्ड सादर केले आहे.”
येस इसेन्स क्रेडिट कार्डच्या प्रमुख सुविधा:
- फॅशन, सौंदर्य, प्रवास आणि फिटनेस क्षेत्रातील आघाडीच्या ब्रँड्सचे वेलकम व्हाउचर
- जेवण, किराणा, खरेदी, सौंदर्य आणि प्रवास यावरील दैनंदिन खर्चावर वाढीव रिवॉर्ड्स
- वार्षिक प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी (कॅन्सर मार्कर स्क्रीनिंगसह)
- वाढदिवसासाठी विशेष व्हाउचर
- चित्रपटाच्या तिकिटांवर बाय वन गेट वन ऑफर आणि भारतातील निवडक मॉल आउटलेट्समध्ये मोफत कॉफी
- ठरावीक खर्चाचे टप्पे गाठल्यावर १०,००० पर्यंत येस रिवॉर्ड्स
येस इसेन्सच्या माध्यमातून, ग्राहकांचा अनुभव अधिक समृद्ध करणाऱ्या आणि त्याचबरोबर अधिक आर्थिक सक्षमीकरण आणि सर्वसमावेशकता यांना चालना देणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण सेवा-सुविधांची निर्मिती करण्याचे कार्य बँक अविरतपणे करत आहे.





