राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची बदनामी तातडीने थांबवावी – तृप्ती देसाई

By: Editor_Pratik

On: Thursday, August 13, 2026 5:32 PM

Google News
Follow Us

पुणे : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात सुरू असलेली बदनामी आणि चुकीची माहिती पसरविण्याचे प्रकार तातडीने थांबवावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केली आहे.

एका व्हिडिओ संदेशाद्वारे तृप्ती देसाई यांनी बावनकुळे यांच्या संदर्भात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर भाष्य करत त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न थांबविण्याचे आवाहन केले. कोणत्याही व्यक्तीविरोधात आरोप करताना तथ्यांची खातरजमा करणे आवश्यक असून, अपुरी किंवा चुकीची माहिती प्रसारित करून बदनामी करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले.

राजकीय मतभेद असू शकतात; मात्र व्यक्तीची बदनामी करण्यासाठी खोटे आरोप अथवा दिशाभूल करणारी माहिती वापरली जाऊ नये. संबंधित प्रकरणाबाबत सत्य परिस्थिती समोर आणून त्यानंतरच निष्कर्ष काढावेत, अशी भूमिका तृप्ती देसाई यांनी मांडली.

दरम्यान, सोशल मीडियावर कोणतीही माहिती प्रसारित करण्यापूर्वी तिची सत्यता तपासावी आणि अफवा किंवा अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now