सॅन फ्रान्सिस्को/मुंबई, ११ जून, २०२६: माहिती तंत्रज्ञान सेवा, सल्ला आणि उद्योगांसाठी उपाययोजना पुरवणारी जागतिक स्तरावरील आघाडीची कंपनी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) (BSE: 532540, NSE: TCS) ने ‘क्लॉड’ बनवणारी आघाडीची एआय कंपनी ‘अँथ्रोपिक’ सोबत जागतिक धोरणात्मक भागीदारीची घोषणा आज केली आहे. या भागीदारीचा मुख्य उद्देश ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर एंटरप्राइझ एआय वापरण्यास मदत करणे हा आहे. टीसीएस या प्रोजेक्टसाठी एक पूर्णपणे स्वतंत्र युनिट तयार करेल, जे केवळ याच तंत्रज्ञानावर काम करेल. टीसीएसला क्लॉडचे नवीन एआय मॉडेल्स सामान्य जनता किंवा इतर कंपन्यांच्या आधी वापरता येतील, जेणेकरून ते वेगाने नवीन टूल्स तयार करू शकतील. या सुरुवातीच्या ऍक्सेसचा फायदा घेऊन ही टीम तीन मुख्य कामे करेल: ग्राहकांना सर्वोत्तम आणि फायदेशीर सर्व्हिस देणे, दोन्ही कंपन्या मिळून वेगवेगळ्या उद्योगांसाठी नवीन एआय टूल्स बनवतील, क्लॉडच्या सर्व एआय मॉडेल्सवर आपली तांत्रिक पकड आणि नैपुण्ये अत्यंत मजबूत करतील.
कडक नियम लागू असणाऱ्या उद्योगांमध्ये एआयचे बहुतांश प्रोजेक्ट्स केवळ सुरुवातीच्या ट्रायलपर्यंतच मर्यादित राहतात. असे घडण्याचे कारण म्हणजे, या क्षेत्रांमध्ये अचूक काम, तपासणीची सुविधा आणि देखरेखीचे नियम अत्यंत कडक असतात, आणि छोट्याशा चुकांमुळे होणारे नुकसान देखील खूप मोठे असू शकते. टीसीएस आणि अँथ्रोपिक यांची भागीदारी नेमकी हीच अडचण दूर करण्यासाठी करण्यात आली आहे. याद्वारे टीसीएसच्या तीन मुख्य वैशिष्ट्यांचा वापर केला जाईल: योग्य नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांसह काम करणे, सुरक्षा आणि नियंत्रण मजबूत ठेवणे, तंत्रज्ञान योग्य पद्धतीने लागू करण्याचा अनुभव. या वैशिष्ट्यांच्या मदतीने मोठ्या कंपन्या ‘क्लॉड’ एआयचा वापर केवळ प्रयोगासाठी नाही, तर आपल्या रोजच्या मुख्य कामकाजात पूर्ण विश्वासाने करू शकतील.
क्लॉड पार्टनर नेटवर्कमध्ये ग्लोबल प्रीमियर पार्टनर म्हणून, टीसीएस त्या मोठ्या कंपन्यांपर्यंत ‘क्लॉड’ एआय मॉडेल्स पोहोचवेल ज्यांना आपल्या कामात शंभर टक्के अचूकता, सिस्टमसोबत सखोल जोडणी, विनाअडथळा काम करण्याची मजबूत क्षमता आणि कडक नियम-कायदे हवे आहेत. कंपनीच्या आत हे मोठ्या प्रमाणावर लागू करून, दोन्ही कंपन्यांद्वारे मिळून बाजारात एआय प्रॉडक्ट्स विकणे, उद्योगांसाठी एकत्र येऊन नवीन शोध लावणे आणि कर्मचाऱ्यांना एआय शिकवणे या एकत्रित प्रयत्नांमुळे ही भागीदारी ग्राहकांना असा व्यावहारिक मार्ग दाखवते ज्याद्वारे ते संपूर्ण बिझनेसमध्ये एआयचा स्वीकार करू शकतील आणि त्यापासून स्पष्ट दिसणारे व मोजता येण्यासारखे परिणाम मिळवू शकतील.
टीसीएस आपल्या इंजिनिअरिंग, फायनान्स, लीगल, मार्केटिंग आणि विक्री विभागांमधील ५०,००० कर्मचाऱ्यांना संपूर्ण कंपनीसाठी परवाना खरेदी करून ‘क्लॉड’ एआय तंत्रज्ञानाने सज्ज करेल. आपल्या स्वतःच्या कंपनीत क्लॉडचा वापर केल्यामुळे, टीसीएसला स्वतःच्या कामकाजाची पद्धत पूर्णपणे बदलण्याचा थेट आणि व्यावहारिक अनुभव मिळेल. त्यानंतर, याच अनुभवाचा आणि आकलनाचा वापर ते आपल्या ग्राहकांना मोठे यश मिळवून देण्यासाठी करतील.
टीसीएस आणि अँथ्रोपिक एकत्र मिळून विविध उद्योगांमध्ये एआय सोल्यूशन्स आणि सेवा बाजारात आणतील. यामध्ये कडक नियम लागू असणाऱ्या क्षेत्रांचा समावेश आहे, जसे की वित्तीय सेवा, सार्वजनिक सेवा, लाईफ सायन्सेस, आरोग्य सेवा, विमान वाहतूक, टेलिकॉम आणि मेडटेक. टीसीएसच्या कन्सल्टिंग, इंजिनिअरिंग आणि व्यवस्थापित सेवा क्षमतेच्या पाठबळासह, दोन्ही कंपन्या विशिष्ट क्षेत्रांमधील कामकाजाच्या पद्धती, आधुनिकीकरण आणि ग्राहकांच्या अनुभवामध्ये बदल घडवून आणण्यासाठी एकत्र येऊन नवीन सोल्यूशन्सचा शोध लावतील.
ही भागीदारी खालील क्षेत्रांमध्ये टीसीएसच्या उत्पादनांपर्यंत, प्लॅटफॉर्म्स आणि विशिष्ट औद्योगिक सोल्यूशन्सपर्यंत देखील विस्तारली जाईल:
- ब्रिटन मधील डिलिजेंटा: टीसीएसचा फायनान्शियल कंडक्ट ऑथॉरिटीद्वारे नियंत्रित असलेला लाईफ आणि पेन्शन बिझनेस, जो २२ दशलक्षपेक्षा जास्त ग्राहकांना सेवा देतो, मोठ्या प्रमाणावर एआय एजंट्सच्या माध्यमातून कामकाजात पूर्ण बदल घडवून ग्राहकांचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी ‘क्लॉड’चा वापर करेल. यासोबतच, बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस आणि इन्शुरन्स प्रॉडक्ट्स आणि प्लॅटफॉर्म्सच्या टीम्स सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आणि आयटी ऑपरेशन्समध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी ‘क्लॉड कोड’चा लाभ घेतील.
- टीसीएस iON भारतामधील १,५०० शहरांमध्ये दरवर्षी ७५ दशलक्षपेक्षा जास्त परीक्षांचे/मूल्यमापनांचे आयोजन करते. या भागीदारीच्या माध्यमातून, टीसीएस iON ‘क्लॉड मॉडेल्स’वर उच्च-प्रभाव असणारे लर्निंग आणि सर्टिफिकेशन प्रदान करेल, ज्यामुळे भारतामध्ये भविष्यासाठी तयार असलेल्या, एआय-प्रमाणित कर्मचारी तयार करण्यास मदत होईल.
- टीसीएस पुन्हा वापरता येण्याजोगे कौशल्य आणि प्लगइन्सच्या माध्यमातून क्लॉड कोड इकोसिस्टममध्ये आपली क्षेत्र-आधारित इंजिनिअरिंग विशेषज्ञता घेऊन येईल, ज्यामध्ये विम्याच्या दाव्यांवरील प्रक्रिया आणि कर्जासंबंधी सल्ला यांसारख्या क्षमतेचा समावेश असेल.
टीसीएसचे सीईओ आणि एमडी के. कृतिवासन म्हणाले: “एंटरप्राइझ एआयचा खरा फायदा व्यवसायाचे वातावरण समजून घेणे, गुंतागुंतीच्या प्रणालींचे व्यवस्थापन करणे आणि सर्वोत्तम एआय इंजिनिअरिंग टॅलेंटचा वापर करणे यातून मिळतो. ‘क्लॉड‘ला आमचा औद्योगिक अनुभव, मजबूत इंजिनिअरिंग आणि मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणण्याच्या आमच्या क्षमतेशी जोडून, आम्ही ग्राहकांना वेगाने चाचणीकडून मुख्य कामकाजाकडे जाण्यास मदत करू. हे विशेषतः अशा उद्योगांसाठी फायदेशीर ठरेल जिथे विश्वास, लवचिकता आणि नियमांचे पालन करणे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. ही भागीदारी टीसीएसच्या त्या मोठ्या धोरणाचा भाग आहे, ज्याअंतर्गत आम्ही एआय तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर लागू करून आमच्या ग्राहकांना नेहमी बदलणाऱ्या काळानुसार स्वतःला बदलणारा व्यवसाय बनवण्यास मदत करतो.”
अँथ्रोपिकचे को-फाउंडर आणि सीईओ डारिओ अमोदेई यांनी म्हटले आहे: “आम्ही ‘क्लॉड‘ला सुरक्षित, विश्वासार्ह आणि उपयुक्त बनवण्यासाठी तयार केले आहे, विशेषतः अशा परिस्थितींसाठी जिथे अचूकता सर्वात जास्त महत्त्वाची असते. ही भागीदारी भारताप्रती असलेली आमची वचनबद्धता अधिक मजबूत करते, जो आमची दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. टीसीएस या क्षेत्रासोबतच जगभरातील कंपन्या आणि व्यावसायिकांपर्यंत क्लॉड पोहोचवेल, ज्यामध्ये स्वतः टीसीएसच्या ५०,००० कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे.”
टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी म्हटले आहे: “ही भागीदारी आम्हा दोन्ही कंपन्यांचा विश्वास दर्शवते की, एआय जगभरातील कंपन्यांसाठी एक पायाभूत आणि क्रांतिकारी तंत्रज्ञान ठरेल. अँथ्रोपिकच्या क्षमतेला टाटा ग्रुपच्या मोठ्या प्रमाणावरील विस्तार, विश्वासार्ह संबंध आणि राष्ट्र उभारणीच्या संकल्पाशी जोडून, आम्ही कंपन्यांच्या आधुनिकीकरणाचा वेग वाढवू आणि भारतातील तरुणांना एआयच्या युगाचे नेतृत्व करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्यांनी सज्ज करू.”





