सिंहगड एपिक ट्रेल मॅरेथॅान येत्या शनिवारी… वेस्टर्न घाट्स रनिंग फाउंडेशनच्या वतीने स्पर्धेचे आयोजन

By: Editor_Manas

On: Wednesday, June 24, 2026 5:34 PM

Google News
Follow Us

पुणे, प्रतिनिधी – वेस्टर्न घाट्स रनिंग फाउंडेशनच्या वतीने सिंहगड एपिक ट्रेल या आंतरराष्ट्रीय मॅरेथॅान स्पर्धा येत्या शनिवारी (दिनांक २७ जून २०२६) रोजी पार पडणार आहे. यावर्षी जगभरातून ४ देश, भारतातील ३५ राज्य व ६५ शहरातून ११ कि.मी., २१ कि. मी., ३० कि.मी., व ४२ कि.मी. अंतर धावण्यासाठी १२०० धावपट्टूंनी सहभाग घेतला आहे. स्वराज्याचा दैदीप्यमान ऐतिहासिक वारसा असलेल्या सिंहगडावर ही स्पर्धा सिंहगडाच्या वेगवेगळ्या पाच वाटांवरून पूर्ण करायची असते. सलग ११ तास चालणाऱ्या या माउंटन ट्रेल मॅरेथॉनमध्ये डोंगर -दऱ्या, चिखल, कडे-कपाऱ्या, आणि सिंहगडाच्या विविध वाटांवरून चित्तथरारक अनूभव स्पर्धकांना मिळतो. पर्यावरण संरक्षण, पुरातन वास्तू आणि गडकोट संवर्धनाच्या संदेशाबरोबरच व्यायामाचा संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जातो. स्पर्धेची सुरवात आणि शेवट सिंहगडाच्या पायथ्याला आतकरवाडी गावापासून करण्यात आली.

या स्पर्धेचे आयोजन वेस्टर्न घाट रनिंग फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिग्विजय जेधे, फाऊंडेशनचे सदस्य अनिल पवार, महेश मालुसरे, मंदार मते, ॲड. राजेश सातपुते, मारूती गोळे, अमर धुमाळ यांच्या सोबतच वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशने ४०० स्वयंसेवकांनी केले आहे.

वेस्टर्न घाट्स रनिंग फाउंडेशन दरवर्षी सिंहगड एपिक ट्रेल या आंतरराष्ट्रीय मॅरेथॅानचे आयोजन जूनच्या अखेरच्या शनिवारी करत असते. सिंहगड एपिक ट्रेल ही स्पर्धा इंटरनॅशनल ट्रेल रनिंग असोसिएशन बरोबर निगडित आहे. ही चित्तथरारक स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्या सर्व शूरवीर मावळ्यांना समर्पित करण्यात येते अशी माहिती संस्थचेचे अध्यक्ष दिग्विजय जेधे यांनी दिली.

यंदाच्या वर्षी स्पर्धेचे उद्घाटन पुणे जिल्हा नियोजन समिती मुख्य अधिकारी श्री किरण इंदलकर, वनविभागाचे श्री महादेव मोहिते, पुरातत्व विभागाचे श्री विलास वाहणे, सिंहगड रोपवेचे अध्यक्ष श्री उदयराज शिंदे घेरा सिंहगड समितीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे.

सिंहगड एपिक ट्रेलचे आयोजन शनिवार दिनांक २७ जून २०२६ ला पहाटे ६ वाजता आतकरवाडी, सिंहगड पायथा येथे होणार आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

July 14, 2026

July 13, 2026

July 13, 2026

July 12, 2026

July 11, 2026

July 9, 2026