पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीटंचाई; महापालिकेने नाममात्र दरात टँकरने पाणीपुरवठा करावा – नगरसेविका श्रुती वाकडकर

By: Editor_Pratik

On: Monday, June 1, 2026 10:50 AM

Google News
Follow Us

पिंपरी-चिंचवड : शहरात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने नाममात्र दरात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी नगरसेविका तथा शिक्षण समिती सदस्या सौ. श्रुती राम वाकडकर यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सध्या शहरातील अनेक भागांमध्ये पिण्याचे व दैनंदिन वापरासाठीचे पाणी अपुरे पडत असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही वर्षांत शहराचा झपाट्याने विस्तार झाला असून लोकसंख्येतही मोठी वाढ झाली आहे. मात्र वाढत्या मागणीच्या तुलनेत पाणीपुरवठा यंत्रणेवर ताण वाढल्याने अनेक गृहनिर्माण सोसायट्यांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.

खासगी टँकरद्वारे पाणी खरेदी करण्यासाठी सोसायट्यांना दरमहा लाखो रुपयांचा अतिरिक्त खर्च करावा लागत असल्याचे वाकडकर यांनी निवेदनात नमूद केले आहे. विशेष म्हणजे खासगी टँकर चालकांना मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होत असून ते संपूर्ण शहरात पाणीपुरवठा करत आहेत. त्यामुळे नागरिकांना पाणीपुरवठा करणे ही महानगरपालिकेची मूलभूत जबाबदारी असल्याने महापालिकेनेही आवश्यकतेनुसार भाडेतत्त्वावर टँकर उपलब्ध करून नाममात्र दरात पाणीपुरवठा करावा, अशी त्यांनी मागणी केली आहे.

शहरातील पाणीटंचाईचे संकट पूर्णपणे दूर होईपर्यंत महापालिकेने विशेष उपाययोजना राबवून टंचाईग्रस्त भागांमध्ये सवलतीच्या दरात टँकरने पाणी उपलब्ध करून द्यावे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महापालिकेने नागरिकांच्या हिताचा विचार करून या मागणीवर सकारात्मक निर्णय घेत तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा सौ. श्रुती वाकडकर यांनी व्यक्त केली आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News