नेटफ्लिक्सचा नवा रिॲलिटी शो ‘लॉक अप: सच या सजा’; रितेश-फराह सांभाळणार सूत्रसंचालन

By: Editor_Manas

On: Friday, June 12, 2026 4:50 AM

Google News
Follow Us

पुणे ११ जून २०२६ : मनोरंजनविश्वात पुन्हा एकदा मोठा धमाका होणार आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि दिग्दर्शिका कोरिओग्राफर फराह खान यांच्या नेतृत्वाखाली ‘लॉक अप: सच या सजा’ हा नवा कॅप्टिव्ह रिॲलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा शो २७ जूनपासून केवळ नेटफ्लिक्स  वर दर शनिवार ते बुधवार रात्री ८ वाजता प्रसारित होणार आहे.

या शोमध्ये तब्बल १४ सेलिब्रिटी स्पर्धकांना एका नियंत्रित आणि अत्यंत तणावपूर्ण वातावरणात ‘कैदी’ म्हणून ठेवण्यात येणार आहे. बाहेरील जगाशी कोणताही संपर्क नसताना त्यांना कठीण टास्क, शिक्षा, आरोपपत्रे आणि सतत बदलणाऱ्या समीकरणांना सामोरे जावे लागणार आहे. सहा आठवड्यांच्या या खेळात प्रत्येक निर्णय त्यांच्या नशिबाचा खेळ बदलू शकतो.

‘लॉक अप: सच या सजा’ हा शो बालाजी टेलिफिल्म्स  आणि नेटफ्लिक्स यांच्या भागीदारीत साकारण्यात आला आहे. आकर्षक प्रॉडक्शन डिझाईन, मानसिक दबाव निर्माण करणारे टास्क आणि सततचा सस्पेन्स यामुळे हा शो हांना खिळवून ठेवणार असल्याची चर्चा आहे.

शोबद्दल बोलताना रितेश देशमुख म्हणाला, “हा शो आजच्या काळाचं प्रतिबिंब आहे. प्रत्येक स्पर्धक स्वतःचं एक सत्य आणि रणनीती घेऊन येतो, पण ‘लॉक अपः सच या सजा’मध्ये प्रत्येक गोष्टीची कसोटी लागते. फराह आणि मी प्रत्येक वळणाचे साक्षीदार असणार आहोत. एक गोष्ट नक्की, इथून बाहेर पडताना कोणीही पूर्वीसारखा राहणार नाही.”

तर फराह खान म्हणाली, “मी अनेक रिॲलिटी शो पाहिले आहेत, पण ‘लॉक अपः सच या सजा’ पूर्णपणे वेगळा अनुभव आहे. येथे कोणतेही फिल्टर्स नाहीत, रीटेक नाहीत. फक्त खऱ्या दबावाखाली सेलिब्रिटींचं खरं रूप दिसणार आहे. रितेश आणि माझी स्टाईल खूप वेगळी असल्यामुळे हा शो आणखी मजेदार होणार आहे.”

उच्च दाबाचा खेळ, भावनिक संघर्ष आणि अनपेक्षित ट्विस्ट्समुळे ‘लॉक अपः सच या सजा’ हा शो प्रेक्षकांसाठी मोठं मनोरंजन पॅकेज ठरणार आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

Trupti Desai

July 15, 2026

July 13, 2026

July 13, 2026

July 12, 2026

July 11, 2026

July 9, 2026