पुणे, जून, २०२६: जेसीबी इंडियाने आपल्या ६,००,००० व्या मशीनचे उत्पादन आणि विक्री करून एक मोठा मैलाचा दगड गाठला आहे. हा टप्पा म्हणजे देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासात योगदान देणारे ग्राहक, डीलर्स, पुरवठादार आणि स्थानिक समुदायांसोबत चार दशकांहून अधिक काळाच्या भागीदारीचे प्रतीक आहे. ही ६,००,००० वी मशीन एक बॅकहो लोडर आहे, जी पायाभूत सुविधा, ग्रामीण आणि कृषी क्षेत्रातील वैविध्यतता व कार्यक्षमतेसाठी ओळखली जाणारी आणि देशात सर्वाधिक वापरली जाणारी बांधकाम मशीन आहे.
गेल्या काही वर्षांत, कंपनीने आपल्या उत्पादनाचा विस्तार केला आहे, प्रबळ पुरवठादार परिसंस्था तयार केली आहे आणि स्थानिक परिस्थितीला अनुकूल अशी उत्पादने विकसित केली आहेत. सहा अत्याधुनिक उत्पादन केंद्रांसह भारत जेसीबीसाठी प्रमुख जागतिक उत्पादन केंद्र बनला आहे. भारतामधून १३५ हून अधिक देशांमध्ये मशीन्सची निर्यात केली जाते.
याप्रसंगी मत व्यक्त करत जेसीबी इंडियाचे सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर श्री. दीपक शेट्टी म्हणाले, “हा मैलाचा दगड केवळ एका आकड्यापुरता मर्यादित नाही, तर अनेक दशकांपासून ग्राहकांनी जेसीबीवर दाखवलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. या यशाचे प्रतिनिधित्व करणारा बॅकहो लोडर भारतातील पायाभूत सुविधा आणि विकासाच्या प्रवासाशी जवळून जोडला गेला आहे. आमच्या प्रवासाचे अविभाज्य घटक राहिलेले ग्राहक, डीलर्स, पुरवठादार व भागधारक यांच्या निरंतर विश्वास आणि पाठिंब्यामुळे हा टप्पा गाठणे शक्य झाले आहे. आमचे अनेक भागीदार आता दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व करत आहेत, ज्यामधून समान मूल्ये आणि परस्परांच्या वाढीवर आधारलेले आमचे दृढ, दीर्घकालीन संबंध दिसून येतात.”
जेसीबीचे चेअरमन लॉर्ड बॅमफोर्ड म्हणाले, “जेसीबीने गेल्या वर्षी आपला ८०वा वर्धापन दिन साजरा केला आणि या ऐंशी वर्षांपैकी जवळपास पन्नास वर्षे आम्ही भारतातील ग्राहकांना जेसीबी मशीन्सची विक्री करत आहोत. मला अत्यंत आनंद होत आहे की, आमच्या वर्धापन दिनाच्या मैलाच्या दगडापाठोपाठ लगेच भारतात ६,००,००० व्या मशीनच्या विक्रीचा ऐतिहासिक टप्पा गाठला गेला आहे. हे अगदी समर्पक आहे की, ही ६,००,००० वी मशीन जेसीबी बॅकहो लोडर आहे, कारण याच मशीनने अलीकडच्या दशकांमध्ये भारतातीलपायाभूत सुविधांच्या उभारणीत मोलाचे योगदान दिले आहे. हे जेसीबीचे सर्वात वैविध्यपूर्ण उत्पादन आहे आणि भारताचे भविष्य घडवण्यासाठी आमचे ग्राहक पुढील अनेक वर्षे या बॅकहो लोडरचा वापर करत राहतील, जी खरोखर एक उल्लेखनीय गोष्ट आहे.”
जेसीबी इंडियाचे श्री. शेट्टी पुढे म्हणाले, “देश पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने गुंतवणूक करत असताना आम्ही नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, स्थानिक पातळीवरील उत्पादन आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून या वाढीला पाठबळ देण्यासाठी कटिबद्ध आहोत. आमचे ग्राहकांना अधिक उत्पादकता देणाऱ्या आणि कमी परिचालन खर्च असणाऱ्या, विश्वासार्ह व इंधन-कार्यक्षम मशीन्सद्वारे अधिक फायदा मिळवून देण्यावर लक्ष केंद्रित आहे.”
जेसीबी इंडिया सरकाराच्या मेक इन इंडिया संकल्पनेचे प्रबळ उदाहरण आहे. कंपनी उत्पादन, अभियांत्रिकी, नवनिर्मिती आणि मनुष्यबळातील गुंतवणुकीच्या माध्यमातून सरकारच्या धोरणांशी सुसंगत काम करत आहे. याव्यतिरिक्त, कंपनी उत्पादन, अभियांत्रिकी आणि नेतृत्व भूमिकांमध्ये महिलांचा सहभाग वाढवून विविधता आणि सर्वसमावेशकतेवर आपला भर अधिक पक्का करत आहे. केवळ उत्पादनापुरते मर्यादित न राहता जेसीबी इंडिया आपल्या सीएसआर उपक्रमांद्वारे समाजात योगदान देत आहे, ज्यामध्ये उपजीविकेला हातभार लावणे आणि कारागिरांना त्यांच्या कलाकुसरीचे प्रदर्शन करण्यासाठी व व्यापक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी मदत करण्यासह विविध स्तरांवर प्रगती साधणे समाविष्ट आहे.
देश आपल्या पायाभूत सुविधांवर आधारित विकासाचा प्रवास पुढे नेण्यासाठी सज्ज असताना जेसीबी इंडिया तंत्रज्ञान, प्रबळ भागीदारी आणि उत्पादकता, शाश्वतता व कौशल्य विकासावरील सातत्यपूर्ण भराद्वारे या प्रगतीला पाठबळ देत आहे.





