रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! २५ जूनपर्यंत गाड्या रद्द, मार्ग बदलले

By: Editor_Manas

On: Sunday, June 7, 2026 9:08 AM

Google News
Follow Us

प्रतिनिधी – मानस, पुणे : पुणे-मिरज दुहेरीकरण प्रकल्पांतर्गत नीरा यार्ड येथे प्री-नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन इंटरलॉकिंगची महत्त्वाची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांसाठी रेल्वे प्रशासनाने ५ ते २५ जूनदरम्यान २१ दिवसांचा विशेष ब्लॉक जाहीर केला असून, यामुळे अनेक रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात मोठे बदल करण्यात आले आहेत. काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या असून काहींचे मार्ग बदलण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

डीएमयू आणि वंदे भारत गाड्यांमध्ये बदल

गाडी क्रमांक ११४२६ कोल्हापूर-पुणे डीएमयू ९, १६, २२ आणि २३ जून रोजी सातारा येथेच प्रवास समाप्त करणार आहे. तर १९ आणि २५ जून रोजी ही गाडी लोणंदपर्यंतच धावणार आहे.

गाडी क्रमांक २०४७५ बिकानेर-मिरज एक्स्प्रेस १५ जून रोजी खडकी येथेच थांबवण्यात येणार आहे. तसेच २०६६९ हुबळी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस १९ जून रोजी सातारा येथेच प्रवास समाप्त करेल.

पुण्याऐवजी सातारा आणि लोणंदहून सुटणार गाड्या

गाडी क्रमांक ११४२५ पुणे-कोल्हापूर डीएमयू ९ ते २४ जूनदरम्यान विविध दिवशी पुण्याऐवजी सातारा स्थानकावरून सुटणार आहे. १९ आणि २५ जून रोजी ही गाडी लोणंद येथून प्रवास सुरू करेल.

तसेच २०४७६ मिरज-बिकानेर एक्स्प्रेस १६ जून रोजी खडकी स्थानकावरून सुटणार आहे. २०६७४ पुणे-कोल्हापूर वंदे भारत एक्स्प्रेस १९ जून रोजी सातारा येथून रवाना होईल.

निजामुद्दीन-वास्को एक्स्प्रेसचा मार्ग बदलला

गाडी क्रमांक १२७८० निजामुद्दीन-वास्को एक्स्प्रेसचा २४ जूनचा प्रवास मनमाड-दौंड-कुर्डुवाडी-मिरज या पर्यायी मार्गाने चालवण्यात येणार आहे.

काही गाड्या उशिराने धावणार

ब्लॉकमुळे काही गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम झाला आहे. कोल्हापूर-पुणे डीएमयू २० जून रोजी नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशिराने, म्हणजे दुपारी १२.५० वाजता सुटणार आहे.

मिरज-निजामुद्दीन एक्स्प्रेस २१ जून रोजी सुमारे १ तास १५ मिनिटे उशिराने रवाना होईल. तर कोल्हापूर-गोंदिया एक्स्प्रेस २५ जून रोजी दोन तास उशिराने, म्हणजे दुपारी ४.५० वाजता सुटणार आहे.

अनेक गाड्यांना मार्गात विलंब

ब्लॉकच्या कामांमुळे कोल्हापूर-पुणे डीएमयू, बंगळूर-गांधीधाम, बंगळूर-एलटीटी, अहमदाबाद-कोल्हापूर, म्हैसूर-अजमेर, बंगळूर-जोधपूर, कोल्हापूर-सीएसएमटी एक्स्प्रेस तसेच कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस या गाड्यांना विविध स्थानकांवर १५ मिनिटांपासून अडीच तासांपर्यंत थांबवण्यात येणार आहे.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी संबंधित गाडीचे अद्ययावत वेळापत्रक तपासण्याचे आवाहन केले आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

Trupti Desai

July 15, 2026

July 14, 2026

July 13, 2026

July 13, 2026

July 12, 2026

July 11, 2026