हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला ऐतिहासिक दर्गा महापालिका प्रशासनाकडून उध्वस्त; परशुराम वाडेकर

By: Editor_Manas

On: Thursday, June 4, 2026 3:31 PM

Google News
Follow Us

प्रतिनिधी – मानस, पुणे : जुन्या पुणे मुंबई महामार्गावर असलेला बोपोडी येथील ऐतिहासिक हजरत शमसुद्दीन दर्गा महापालिका प्रशासनाने कोणतेही संयुक्तिक कारण न देता, स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता आणि आवश्यक त्या कायदेशीर बाबींची पूर्तता न करता मनमानी पद्धतीने कारवाई करून उध्वस्त केला आहे, असा आरोप उपमहापौर व स्थानिक नगरसेवक परशुराम वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. याप्रकरणी सर्वसाधारण सभेत प्रशासनाला जाब विचारला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

बोपोडी येथे संबंधित दर्गा तब्बल दीडशे वर्षांपासून उभा आहे. त्याला राज्य शासनाचा अ वर्ग प्राप्त आहे. मेट्रो अथवा रस्ता रुंदीकरणात या दर्ग्याची कोणतीही अडचण नाही. या दर्ग्याबाबत कोणत्याही स्थानिक नागरिकाने अथवा लोकप्रतिनिधी तक्रार केलेली नाही. हा दर्गा या परिसरातील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक होता. तरीही महापालिका प्रशासनाने लोकप्रतिनिधींची दिशाभूल करून या दर्ग्यावर अन्यायकारक कारवाई केल्याचे वाडेकर यांनी सांगितले.

शिवशंकर स्वामी नामक एका व्यक्तीने हा दर्गा हटवण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केल्याची माहिती मिळाल्याचे वाडेकर यांनी सांगितले. दर्ग्याच्या ट्रस्टला पूर्वकल्पना न देता, नोटीस न बजावता, उपमहापौर व स्थानिक नगरसेवक म्हणून आपल्याला व अन्य स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता रात्रीच्या अंधारात करण्यात आलेली ही कारवाई सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याची मान खाली घालायला लावणारी आहे. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आपण त्याच्यात तीव्र निषेध करतो, असे वाडेकर यांनी सांगितले.

या प्रकाराची कल्पना आपण राज्य मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांना दिली असून त्यांनी देखील या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व महत्त्वाच्या नेत्यांचे प्रशासनाच्या मनमानी कारभाराकडे लक्षवेध होणार असल्याचेही वाडेकर यांनी स्पष्ट केले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

Trupti Desai

July 15, 2026

July 14, 2026

July 13, 2026

July 13, 2026

July 12, 2026

July 11, 2026