एचडीएफसी म्युचुअल फंडची ‘नारी निवेश यात्रा’ देशभरातील महिलांमध्ये आर्थिक जागरूकता आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणार

By: Editor_Manas

On: Wednesday, June 17, 2026 3:15 PM

Google News
Follow Us

पुणे, जून 17, २०२६: एचडीएफसी म्युचुअल फंडची ‘नारी निवेश यात्रा’ मुंबईहून सुरू झाल्यानंतर आता पुण्यात पोहोचली आहे. महिलांनी  गुंतवणूक आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजनाची नीट माहिती करून घेऊन स्वतःच्या आर्थिक भविष्याची धुरा स्वतःच्या हातात घ्यावी यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी तयार केलेला, हा अशा प्रकारचा पहिलाच देशव्यापी गुंतवणूकदार शिक्षण आणि जागरूकता उपक्रम आहे.

घरातील आर्थिक निर्णय घेण्यामध्ये आणि कुटुंबासाठी संपत्ती निर्मितीमध्ये महिला बजावत असलेली वाढती महत्त्वाची भूमिका ओळखून, सहा महिन्यांच्या एका व्यापक संपर्क कार्यक्रमाद्वारे गुंतवणूकदार शिक्षण थेट देशभरातील विविध घटकांपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

या उपक्रमाचा एक भाग म्हणून, दोन प्रचार वाहने भारताच्या दोन वेगवेगळ्या दिशांना अनेक शहरे तसेच लहान गावांमधून प्रवास करतील. प्रत्येक ठिकाणी, एचडीएफसी म्युचुअल फंड अनेक वेगवेगळ्या परिसरांमध्ये जाऊन स्थानिक लोकांशी संवाद साधणारे उपक्रम आयोजित करेल. यामध्ये पथनाट्ये सादर केली जातील आणि गुंतवणूकदारांसाठी संवादात्मक जागरूकता सत्रे आयोजित केली जातील. पैशांशी संबंधित क्लिष्ट संकल्पना सोप्या करून सांगितल्या जातील आणि गुंतवणुकीविषयी चर्चा करण्यास प्रोत्साहन दिले जाईल.

एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या ‘नारी निवेश यात्रे’च्या पुणे टप्प्यामध्ये, पुण्यातील प्रमुख ठिकाणी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला जात आहे. यामध्ये कोथरूड, रामसुख मार्केट, गुलटेकडी मार्केट यार्ड, तुळशीबाग मार्केट, जुना बाजार, करिश्मा सोसायटी मार्केट आणि डहाणूकर कॉलनी मार्केट यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश आहे. पथनाट्ये, गुंतवणूकदार जागरूकता सत्रे आणि थेट संवादाच्या माध्यमातून हा उपक्रम आर्थिक नियोजन, शिस्तबद्ध गुंतवणूक आणि दीर्घकालीन संपत्ती निर्मिती या विषयांवरील माहिती व चर्चा थेट शहरातील महिलांपर्यंत पोहोचवत आहे.

या यात्रेचा मुख्य उद्देश अगदी सामान्य आणि तळागाळातील महिलांशी थेट संवाद साधणे हा आहे. या संपूर्ण मोहिमेदरम्यान, एचडीएफसी म्युचुअल फंड देशभरातील महिला बचत गटांसाठी ६० खास कार्यक्रम आयोजित करणार आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांना पैशांचे नियोजन कसे करावे, स्वतःचे ध्येय ठरवून योग्य गुंतवणूक कशी करावी आणि भविष्यासाठी मोठी पुंजी कशी उभी करावी, याचे सोपे मार्गदर्शन केले जाईल. तसेच, महिलांना गुंतवणुकीची चांगली आणि शिस्तबद्ध सवय लागावी यासाठी एक उत्तम संधी या निमित्ताने उपलब्ध करवून दिली जाईल.

या उपक्रमाबद्दल बोलताना एचडीएफसी ऍसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नवनीत मुनोत म्हणाले, “संपूर्ण भारतात, महिला अनेकदा घरातील सर्वात शिस्तबद्ध बचत करणाऱ्या सदस्य असतात. तरीही, वैयक्तिक आर्थिक बचतीविषयी योग्य चर्चा कधी झालीच नसल्यामुळे, अनेकींना पद्धतशीर गुंतवणूक करणे शक्य झाले नाही. ‘नारी निवेश यात्रा’ ही याच चर्चेवर आधारित आहे. पथनाट्ये, सामुदायिक सत्रे आणि बचत गटांशी थेट संवादाच्या माध्यमातून, आम्हाला ही चर्चा थेट महिलांपर्यंत पोहोचवायची आहे. यामुळे त्यांना गुंतवणूक ही कोणतीतरी अवघड किंवा लांबची गोष्ट न वाटता, त्यांच्या मनात आधीपासूनच असलेल्या आर्थिक ध्येयांना पूर्ण करणारे एक व्यावहारिक साधन वाटू लागेल.”

‘नारी निवेश यात्रा’ हा उपक्रम एचडीएफसी म्युचुअल फंडच्या ‘बरनी से आझादी’ (बरणीपासून मुक्ती) या गुंतवणूकदार शिक्षण आणि जागरूकता मोहिमेचाच एक भाग म्हणून राबवला जात आहे. ही मूळ मोहीम लोकांना पारंपरिक बचतीच्या पद्धतींच्या पलीकडे जाण्यासाठी आणि त्यांची आर्थिक स्वप्ने पूर्ण करण्यासाठी माहितीपूर्ण गुंतवणुकीचे फायदे समजून घेण्यास प्रोत्साहित करते.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

June 17, 2026

June 17, 2026

June 17, 2026

June 17, 2026

June 17, 2026

June 17, 2026